जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मोठी बातमी: उद्धव ठाकरेंकडून धनुष्यबाण चिन्ह जाणार?

मोठी बातमी: उद्धव ठाकरेंकडून धनुष्यबाण चिन्ह जाणार?

मोठी बातमी: उद्धव ठाकरेंकडून धनुष्यबाण चिन्ह जाणार?

शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणखी एक धक्का बसू शकतो. त्याची तयारी ठाकरे यांनी सुरू केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 जुलै : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण हे जाण्याची शक्यता आहे. विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसू शकतो. धनुष्यबाण चिन्ह गमावल्यास नव्या निवडणूक चिन्हाची तयारी ठेवा, अशी सूचना उद्वव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केली आहे. कमीत कमी कालावधीमध्ये नवं चिन्ह लोकांपर्यंत पोहचावं म्हणून कामाला लागा, असे आदेश ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. या वर्षी मुंबई महापालिकेसह राज्यातील प्रमुख महापालिका निवडणुका आहेत. त्यामुळे कमी कालावधीमध्ये नवं चिन्ह पोहचवण्याचं आव्हान शिवसेनेपुढे असेल. यापूर्वी एकनाथ शिंदे हेच विधीमंडळ गटनेते आहेत, यावर विधिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे अजय चौधरी यांचे गटनेतेपद रद्द करण्यात आले आहे.  विधिमंडळ सचिवालयानं याला मान्यता दिली आहे.  शिंदे यांच्या गटनेतेपदाला मान्यता दिली असल्यामुळे आता भर गोगावले हेच मुख्य प्रतोद असल्याचे मान्य करण्यात आले आहे. आणि शिवसेनेते सुनील प्रभूंना दिलेलं मुख्य प्रतोदपद रद्द करण्यात आलं आहे. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यातील वादावर अभ्यास करून हा निर्णय दिला. देशभक्ती म्हणजे सडकछाप धर्मांधतेचे ओंगळवाणे..’; आता बंडखोर आमदारांना शिवसेनेचा सल्ला शिवसेना ठाकरे गटाचे विधिमंडळ गट नेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनिल प्रभू यांची मान्यता विधिमंडळ सचिवालयाने रद्द केली आहे. विधिमंडळाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह गमवावं लागू शकतं, याची जाणीव झाल्यानंच उद्धव ठाकरे यांनी हा आदेश दिल्याचं मानलं जातंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात