जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / अजून काय पुरावा हवा? Rashmi Shukla प्रकरणावरून आव्हाडांचा भाजपवर मोठा हल्ला

अजून काय पुरावा हवा? Rashmi Shukla प्रकरणावरून आव्हाडांचा भाजपवर मोठा हल्ला

अजून काय पुरावा हवा? Rashmi Shukla प्रकरणावरून आव्हाडांचा भाजपवर मोठा हल्ला

‘शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपाबरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी…’

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 मार्च : पोलीस दलात बदल्यांसाठी फोन टॅपिंग प्रकरणावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ‘रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी अपक्ष आमदाराला महाविकास आघाडीत (MVA Government) प्रवेश घेऊ नये यासाठी दबाव टाकला’, असा थेट आरोप केला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फोन टॅपिंग प्रकरणाचा खुलासा करत महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून एकच खळबळ उडवून दिली आहे.

जाहिरात

‘शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपाबरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखिल प्रयत्न केला होता’ असा दावा आव्हाड यांनी केला आहे. दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणात धक्कादाक माहिती समोर आली आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी दहशतवादी प्रकरणासाठी फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. पण, त्यांची याचा गैरवापर केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांनी रितरस फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. दहशतवादी प्रकरणामध्ये पुरावे शोधून काढण्यासाठी त्यांनी ही परवानगी घेतली होती. बोटीतून पक्ष्याला देत होता खाणं; समुद्रातून आला भलामोठा मासा आणि… धडकी भरवणारा पण हे करत असताना रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांचे फोन सुद्धा टॅप केले आहे, असा आरोप काही मंत्र्यांनी केला आहे. याबद्दलचा सीएस आपला संपूर्ण अहवाल हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार आहे. तर ‘रश्मी शुक्ला यांनी परवानगी न घेता फोन टॅप केले होते. महाविकास आघाडी सरकार बनवण्याचे काम सुरू होते. शुक्ला फोन टॅप करत होत्या, त्या भाजपासाठी काम करत होत्या, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. या प्रकरणाची महाविकास आघाडी सरकारने गंभीर दखल घेतली असून चौकशी केली जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात