बोटीतून पक्ष्याला देत होता खाणं; समुद्रातून आला भलामोठा मासा आणि... धडकी भरवणारा VIDEO

बोटीतून पक्ष्याला देत होता खाणं; समुद्रातून आला भलामोठा मासा आणि... धडकी भरवणारा VIDEO

एक भलामोठा मासा बोटीत शिरतो आणि पुढे काय होतं ते तुम्हीच पाहा.

  • Share this:

मुंबई, 25 मार्च : समुद्रात (Sea) बोटीतून (Boat) प्रवास करताना पक्ष्यांना खायला देण्याचा आनंद काही औरच. उडत उडत पक्षी येतात आणि आपल्या हातातील खाद्य नेतात तेव्हा मनाला किती आनंद वाटतो. अनेकांना पक्ष्यांना असं खायला द्यायला आवडतं. पण समजा पक्ष्यांना खायला देता देता जर त्या खाद्यावर भल्यामोठ्या माशाने (Fish) ताव मारला तर. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होत आहे.

एक व्यक्ती भरसमुद्रात बोटीतून पक्ष्यांना खायला घालत होता. त्यावेळी एक भलामोठा मासा त्याच्या बोटीत शिरतो आणि पुढे काय होतं ते तुम्हीच पाहा.

व्हिडीओ पाहू शकता, बोटीच्या एका भागात पक्ष्यांसाठी खाद्य ठेवलं आहे. तिथं एक व्यक्ती त्यातील एकेएक खाद्य काढून पक्ष्यांना देते आहे. एकेएक करून पक्ष्यांचा थवाच जमा होतो. त्या व्यक्तीला आनंद होतो. इतक्यात समुद्रातून एक भलामोठा मासा वर येतो आणि तो त्याच्या बोटीत शिरतो. हा मासा म्हणजे सील मासा (sea lion) आहे.

हे वाचा - लय भारी! टिकटॉक....टिकटॉक... मॉडेल्सनाही मागे टाकेल असा कावळ्याचा कॅटवॉक

सुरुवातीला हा मासा त्या व्यक्तीवर हल्ला करतो की काय असंच वाटतं आणि मनात एकच धडकी भरते. पण सुदैवाने तसं होत नाही. मासा बोटीत येताच ती व्यक्ती त्याला सुरुवातीला काही मासे स्वतःच्या हाताने खायला देतं. मग मात्र मासा थेट बोटीत येतो आणि जिथे हे छोटे मासे ठेवलेले असतात तिथंच तोंड घुसवतो. तेव्हा ती व्यक्ती त्याच्यापासून दूर होते.  एकेएक करत तो सर्व मासे फस्त करतो आणि मग पुन्हा समुद्राच्या पाण्यात उडी मारतो.

हे वाचा - फोटो काढणाऱ्या बापलेकीला पाहून पिसाळला हत्ती; मागून आला आणि... धक्कादायक VIDEO

व्यक्ती पुन्हा येऊ त्या भांड्यात डोकावतो तर तिथं एकही मासा शिल्लक नसतो. पक्ष्यांसाठी असलेल्या खाद्यावर हा मासा तावच मारतो.  सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.

Published by: Priya Lad
First published: March 25, 2021, 7:59 AM IST

ताज्या बातम्या