मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Dussehra Melava पूर्वी Ramdash Kadam यांचं पक्ष प्रमुख Uddhav Thackeray यांना पत्र, म्हणाले...

Dussehra Melava पूर्वी Ramdash Kadam यांचं पक्ष प्रमुख Uddhav Thackeray यांना पत्र, म्हणाले...

विधान परिषदेच्या जागेसाठी (Maharashtra Legislative Council election) शिवसेनेनं (shivsena) एकाच दगडात निशाणा साधून पक्षासोबत एकनिष्ठ न राहणाऱ्यांना धडा शिकवला आहे.

विधान परिषदेच्या जागेसाठी (Maharashtra Legislative Council election) शिवसेनेनं (shivsena) एकाच दगडात निशाणा साधून पक्षासोबत एकनिष्ठ न राहणाऱ्यांना धडा शिकवला आहे.

Ramdas Kadam letter to Uddhav Thackeray: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापूर्वी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 15 ऑक्टोबर : शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) हे आजच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला (Shiv Sena Dussehra Melava) उपस्थित राहणार की नाहीत याबाबत विविध चर्चा रंगत होत्या. त्यात दरम्यान आता रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपण आज दसरा मेळाव्यास तब्येतीच्या कारणास्तव येत नसल्याचं रामदास कदम यांनी कळवलं आहे.

गेले 3 महिने रामदास कदम आजारी आहेत. त्यांना डाँक्टरांनी गर्दीत न जाण्याचं आणि विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शिवसेना नेते रामदास कदम आज संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यास उपस्थित रहाणार नाहीत. काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांच्या आवाजाची एक कथित आँडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यात ते भाजप नेते किरीट सोमय्या यांना परीवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधातील पुरावे देण्यासंदर्भात खेड मधील स्थानिक कार्यकर्त्यांशी फोन वरून संवाद साधत आहेत.

मेळाव्याकडे पाठ की नो एन्ट्री?

या कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेत मोठं वादळ निर्माण झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या दसरा मेळाव्यास शिवसेना नेते रामदास कदम उपस्थित रहाणार की नाही यावर मोठी चर्चा राजकिय वर्तुळात सुरू होती. पण आता ते मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान रामदास कदम यांना शिवसेनेने मेळाव्यास प्रवेश दिला नाही की रामदास कदम यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली यावरुन आता विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

शिवसेनेचा भाजपवर निशाणा

संजय राऊत म्हणाले, दसरा मेळावा आज आहे... संध्याकाळी जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख भाषणाला उभे राहतात तेव्हा तुम्हाला कळेल की विजयादशमीनिमित्त शमीच्या झाडावरची शस्त्रे काढली जातात ती कुणासाठी आहेत, कशासाठी काढली जातात. नक्कीच आजचं त्यांचं भाषण महत्त्वाचं आहे. देशात आणि महाराष्ट्रात मधल्या काळात अनेक घडामोडी घडल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख काय भूमिका मांडतात याकडे देशभराचं लक्ष आहे. षण्मुखानंद सभागृहात सर्व नियमांचे पालन करुन आजचा मेळावा होईल. या मेळाव्यातून नक्कीच महाराष्ट्राला, देशाला, राजकारणाला एक दिशा देण्याचा प्रयत्न होईल.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेने शिवसेनेला डिवचलं

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना भवनासमोर पोस्टर्स लावून शिवसेनेला डिवचल्याचं दिसून येत आहे. मनसेकडून दसऱ्याच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवर 'गर्व से कहो, हम हिंदू है' म्हटलेलं असून त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटोही पहायला मिळत आहे. सेनाभवना समोर हे पोस्टर लावून एकीकडे मनसे हिंदूत्वाचा नारा बुलंद करत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने हिंदूत्वापासून फारकत घेतली आहे असे दाखवण्याता प्रयत्न या पोस्टर मधून होत आहे. शिवसेनाचा आज दसरा मेळावा होत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापूर्वी मनसेने असे पोस्टर्स लावून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिवसेनेवर सातत्याने हिंदूत्वापासून फारकत घेतल्याची टीका होत आहे. तर दुसरीकडे आगामी ननपा निवडणुकांत मनसे आणि भाजपची युती होणार असल्याची चर्चा रंगत आहे. त्यातच आता मनसेकडून हिंदूत्वाचा नारा देणारे पोस्टर्स मुंबईत झळकले आहेत.

First published:

Tags: Ramdas kadam, Shiv sena, Uddhav thackeray