मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /...तर उदयनराजेंनी रिपाइंत यावं, रामदास आठवलेंची आॅफर

...तर उदयनराजेंनी रिपाइंत यावं, रामदास आठवलेंची आॅफर

'उदयनराजेंनी रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी स्वीकारल्यास त्यांना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय पद सुद्धा देण्यात येईल'

'उदयनराजेंनी रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी स्वीकारल्यास त्यांना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय पद सुद्धा देण्यात येईल'

'उदयनराजेंनी रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी स्वीकारल्यास त्यांना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय पद सुद्धा देण्यात येईल'

    मुंबई, 0८ आॅक्टोबर : आगामी लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे. जर राष्ट्रवादी त्यांना तिकीट देणार नसेल तर उदयनराजे भोसले यांनी रिपाइंत यावं त्यांना तिकीट देऊ अशी आॅफरच आरपीआयचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

    केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज इंदू मिल येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक काम पाहणी केली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांना करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलंय. यावेळी त्यांनी उदयनराजे भोसले यांना थेट पक्षाकडून निवडणूक लढवण्याची आॅफर दिली.

    मागील सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना रिपाइं महायुतीची सातारा जागा ही रिपब्लिकन पक्षाकडे होती. त्यामुळे रिपाइंच्या कोट्यातील ही जागा उदयनराजेंना देण्याची आपली ऑफर असल्याचं रामदास आठवले स्पष्ट केलं.

    उदयनराजे हे शिवछत्रपतींचे वंशज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असणारे उदयनराजे रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास उभे राहिले तर रिपब्लिकन पक्षाची एकजातीय प्रतिमा बदलण्यास मोठी मदत होईल. राज्यात रिपाइंमधून दलित मराठा एकजुटीचा संदेश जाईल. ते स्वतः लोकप्रिय असून सातारा लोकसभा मतदारसंघात त्यांचे स्वतःचे मतदान आहे. त्याच बरोबर रिपब्लिकन पक्षाचे मतदान आहे. सोबत भाजपशी युती असल्याने त्यांच्याही मतांच्या मदतीने सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजेंना रिपाइंच्या तिकिटावर निवडून येता येईल असा दावाही रामदास आठवलेंनी केला.

    तसंच उदयनराजेंनी रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी स्वीकारल्यास त्यांना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय पद सुद्धा देण्यात येईल अशी माहितीही रामदास आठवलेंनी दिली.

    संजय निरुपम यांच्यावर टीका

    काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी निवडणुकांच्या तोंडावर मराठी माणसांचा अवमान करणारी घेतलेली भूमिका काँग्रेसला पराभवाच्या गर्तेत ढकलणारी ठरणार आहे. उत्तर भारतीयांनी मुंबई च्या विकासात मोठा सहभाग घेतला आहे हे खरे असले तरी मुंबईच्या विकासासाठी मराठी माणसांचेच सर्वात अधिक योगदान राहिले आहे. उत्तर भारतीयांची बाजू घेताना त्यांनी मराठी माणसांचा अवमान करू नये तसंच मराठी आणि उत्तर भारतीय असा वाद करू नये असं आवाहनही रामदास आठवलेंनी केलं.

    मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे या आठवड्यात विस्तार होईल. मुख्यमंत्र्यांनी रिपाइंला दिलेलं आश्वासन पाळतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना सोबत आल्यास 2 जागांची मागणी करणार आहे. सोबत नाही आली तर 4 जागांची मागणी करणार असल्याचंही आठवलेंनी सांगितलं.

    VIDEO: आणखी एक थक्क करणारा रेल्वे स्टंट आला समोर

    First published:

    Tags: NCP, Ramdas athawale, RPI, Udayanraje bhosale, उदयनराजे भोसले, रामदास आठवले