मुंबई, 3 जून : राज्यसभेच्या महाराष्ट्रतील सहा जागांसाठी होणारी निवडणूक (Rajya Sabha Election 2022) ही बिनविरोध व्हावी यासाठी आज सकाळी मविआ नेत्यांच्या एक शिष्टमंडळाने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट (MVA leaders delegation meet Devendra Fadnavis) घेतली. यावेळी मविआने भाजपला एक प्रस्ताव (MVA offer proposal to bjp) दिला. पण भाजपने हा प्रस्ताव धुडकावून लावत उलट मविआलाच प्रस्ताव दिला. मविआचा प्रस्ताव धुडकावल्याने भाजप आपला तिसरा उमेदवार मागे घेणार नाही हे स्पष्ट आहे. हेच लक्षात घेता आता शिवसेनेकडून खास रणनिती आखण्यात येत आहे. शिवसेनेची आक्रमक मोर्चेबांधणी सुरू राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. शिवसेना समर्थक सर्व अपक्ष आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 6 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता वर्षा निवास्थानी बैठकीचं निमंत्रण दिलं आहे. राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदार आणि शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना 8 ते 10 जून रोजी मुंबईत येण्यास सांगितले आहेत. मुंबईतल्या ट्रायडंट हाँटेलवर रहाण्यासाठी येण्याचे शिवसेनेने सर्व आमदारांना आदेश दिले आहेत. वाचा : मविआ शिष्टमंडळ आणि भाजप नेत्यांची बैठक संपली; काय झाली चर्चा अन् काय ठरलं? राज्यसभा निवडणुकीसाठी येत्या 10 जून रोजी विधान भवनात मतदान होणार आहे. त्यापूर्वी कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना 8 जून रोजी मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई येणाऱ्या शिवसेनेच्या सर्व आमदारांना ट्रायडंट हाँटेलमध्ये रहाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 8 जून ते 10 जून अशी व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपकडून आमदारांची फोडा फोडी होऊ शकते त्यासाठी शिवसेनेनं आतापासूनच रणनिती आखल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. मविआचा प्रस्ताव भाजपने धुडकावला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा काल देवेंद्र फडणवीसांना निरोप आला की, तिन्ही पक्षांचे नेते भेटायला येणार आहेत. त्यानुसार आज तिन्ही पक्षांचे नेते भेटायला आले. आमच्या पक्षाच्या वतीने देवेंद्र फडणवीस आणि मी होतो. राज्यसभेची निवडणूक 10 जून रोजी होणार आहे. गेल्या 20 वर्षांची परंपरा आहे की, राज्यसभा-विधान परिषदेत जर निवडणुका झाल्या तर क्रॉस वोटिंग होतं आणि प्रचंड गोंधळ होतो. परंतू ज्यावेळी बिनविरोध होते त्यावेळी वस्तूस्थितीच्या आधारे होते. त्यामुळे आमचा आग्रह आहे की, राज्यसभेच्या भाजपला तीन जागा मिळाव्या आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांच्या बाबतीत काही विचार करता येईल. मविआच्या नेत्यांनी खूप चर्चा झाल्यावर तोच-तोच प्रस्ताव मांडला की, भाजपने राज्यसभेचा तिसरा उमेदवार मागे घेतला आणि विधानपरिषदेला भाजपचा 4 चा कोटा आहे त्याऐवजी पाचवी जागा आम्ही देऊ. आम्ही सांगितलं की, आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राज्यसभा जास्त महत्त्वाची असते. एकाच पक्षाचे 24 अधिक 6 इतकी अधिक मते आमच्याकडे आहेत. 11-12 मते जमवण्यासाठी काय कठीण आहे. तुमच्याकडे तिघांची मतांची गोळाबेरीज करुन सुद्धा आमच्या 30च्या पुढे जात नाहीयेत. दुसरा मुद्दा आहे की, मागच्यावेळी आमच्या तीन जागा होत्या त्या तीन जागा आम्हाला मिळाव्या. आम्ही त्यांना आग्रहाने म्हटलं की, आम्ही विधानपरिषदेला पाचवी जागा लढवणार नाही तुम्ही राज्यसभेचा उमेदवार मागे घ्यावा. यावर त्यांनी आपआपसात विचार करण्यासाठी गेले आहेत. आम्ही आमच्या आपआपसात विचार करतोच. आम्ही तिसरी जागा लढणं आणि विजयी होणं याबाबत खूप कॉन्फिडन्स आहोत असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.