मुंबई, 3 जून : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी एकूण सात उमेदवार रिंगणात (Rajya Sabha Election 2022) आहेत. मात्र, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीचे नेते प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच मविआच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळ (MVA leaders delegation) आज भाजप नेते देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भेटीला पोहोचले. यावेळी मविआकडून भाजपला एक प्रस्ताव देण्यात आला. या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाल्याचं भुजबळांनी म्हटलं आहे. मविआ नेत्यांची भाजपला विनंती छगन भुजबळ यांनी म्हटलं, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्यापैकी अनेकदा यश सुद्धा मिळतं. आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपला विनंती केली की, राज्यसभेचा एक उमेदवार तुम्ही वाढवला आहे तो मागे घ्यावा अशी आमची विनंती आहे. तो उमेदवार मागे घेतल्यास निवडणूक बिनविरोध होईल. त्यानतंर विधान परिषदेची एक जागा आम्ही तुम्हाला देऊ वाढवून देऊ आणि मग ती निवडणूक सुद्धा बिनविरोध होण्यासाठी मदत होईल. वाचा : राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचा मविआचा भाजपला प्रस्ताव, पण भाजपच्या मनात काय? वाचा फडणवीस भेटीची INSIDE STORY आम्ही हे सुद्दा सांगितलं की, सहाव्या जागेसाठी तुमच्यापेक्षा आमच्याकडे जादा मते आहेत. उमेदवारांना देण्यासाठी आमच्याकडे अधिक मते आहेत. शेवटच्या जागेसाठी जी गोळाबेरीज करायची आहे. उरलेली मते मिळवायची आहेत त्या मतांची संख्या मविआकडे जास्त आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की, तुम्ही आम्हाला ही संधी द्या. आमचा सहावा उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध जाऊ द्या. त्यानंतर त्याची भरपाई विधानपरिषदेच्या वेळी करू असंही भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ पुढे म्हणाले, त्यावर भाजपने म्हटलं, उलटं का नको करायला? आम्ही म्हटलं, लोकसभा-राज्यसभेत तुमचे अधिक प्रतिनिधी आहेत. आमची माणसेच तिथे कमी आहेत. त्यामुळे आमचा एखादा जादा व्यक्ती गेला तर बरं होईल. चर्चा चांगली झाली, हसत-खेळत चर्चा झाली. तीन वाजेपर्यंत माघार घ्यायची आहे. आता भाजप नेते दिल्लीत बोलतील आणि आमचा प्रस्ताव सांगतील. कदाचित एक-दीड तासाने पुन्हा त्यांच्यासोबत थेट बोलणं होईल. त्यानंतर तीन वाजता माघार घ्यावी अशी आम्हाला अपेक्षा आहे. भाजप नेत्यांची बैठक सुरू महाविकास आघाडीच्या नेत्यांचं शिष्टमंडळ हे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निघाले आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत भाजप काय निर्णय घेतं याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.