जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Rajya Sabha Election: निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मविआची धावपळ, MVAच्या ऑफरवर भाजपने घेतला मोठा निर्णय

Rajya Sabha Election: निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मविआची धावपळ, MVAच्या ऑफरवर भाजपने घेतला मोठा निर्णय

Rajya Sabha Election: निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मविआची धावपळ, MVAच्या ऑफरवर भाजपने घेतला मोठा निर्णय

Rajya Sabha Election: निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मविआची धावपळ, MVAच्या ऑफरवर भाजपने घेतला मोठा निर्णय

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 जून : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांवर बिनविरोध निवडणूक (Rajya Sabha Election 2022) होण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. त्यासाठी मविआ नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज भाजप नेते देवेंद्र फडणवीसांची भेट (MVA leaders delegation meet Devendra Fadnavis) घेत प्रस्ताव दिला. त्यानंतर भाजप नेत्यांची एकमेकांसोबत चर्चा झाली. या चर्चेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत मोठं विधान केलं आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा काल देवेंद्र फडणवीसांना निरोप आला की, तिन्ही पक्षांचे नेते भेटायला येणार आहेत. त्यानुसार आज तिन्ही पक्षांचे नेते भेटायला आले. आमच्या पक्षाच्या वतीने देवेंद्र फडणवीस आणि मी होतो. राज्यसभेची निवडणूक 10 जून रोजी होणार आहे. गेल्या 20 वर्षांची परंपरा आहे की, राज्यसभा-विधान परिषदेत जर निवडणुका झाल्या तर क्रॉस वोटिंग होतं आणि प्रचंड गोंधळ होतो. परंतू ज्यावेळी बिनविरोध होते त्यावेळी वस्तूस्थितीच्या आधारे होते. त्यामुळे आमचा आग्रह आहे की, राज्यसभेच्या भाजपला तीन जागा मिळाव्या आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांच्या बाबतीत काही विचार करता येईल. मविआच्या नेत्यांनी खूप चर्चा झाल्यावर तोच-तोच प्रस्ताव मांडला की, भाजपने राज्यसभेचा तिसरा उमेदवार मागे घेतला आणि विधानपरिषदेला भाजपचा 4 चा कोटा आहे त्याऐवजी पाचवी जागा आम्ही देऊ. आम्ही सांगितलं की, आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राज्यसभा जास्त महत्त्वाची असते. वाचा :  मविआ शिष्टमंडळ आणि भाजप नेत्यांची बैठक संपली; काय झाली चर्चा अन् काय ठरलं? वाचा एकाच पक्षाचे 24 अधिक 6 इतकी अधिक मते आमच्याकडे आहेत. 11-12 मते जमवण्यासाठी काय कठीण आहे. तुमच्याकडे तिघांची मतांची गोळाबेरीज करुन सुद्धा आमच्या 30च्या पुढे जात नाहीयेत. दुसरा मुद्दा आहे की, मागच्यावेळी आमच्या तीन जागा होत्या त्या तीन जागा आम्हाला मिळाव्या. आम्ही त्यांना आग्रहाने म्हटलं की, आम्ही विधानपरिषदेला पाचवी जागा लढवणार नाही तुम्ही राज्यसभेचा उमेदवार मागे घ्यावा. यावर त्यांनी आपआपसात विचार करण्यासाठी गेले आहेत. आम्ही आमच्या आपआपसात विचार करतोच. आम्ही तिसरी जागा लढणं आणि विजयी होणं याबाबत खूप कॉन्फिडन्स आहोत असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. आज खूप खेळीमेळीत चर्चा झाली. त्यांना जशी तिन्ही पक्षांची मिळून तयार झालेल्या आघाडीची काळजी आहे तशाच प्रकारे आम्हाला आमच्या पक्षाची काळजी आहे. तिसरा उमेदवार मागे घेणं आमच्या लेवलला शक्य नाहीये. आम्हाला पक्षासोबत आणि दिल्लीलाही बोलावं लागेल. आम्ही आमच्याबाबतीत काय ते सांगितलं आहे. त्यांनी त्यांचा उमेदवार मागे घेतला नाही. त्यांनी जर आमचा प्रस्ताव मान्य केला नाही तर ही राज्यसभेची निवडणूक होणार हे स्पष्ट आहे. पक्ष श्रेष्ठींकडून आमच्या भूमिकेला पाठिंबा आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेली ऑफर भाजपने मान्य केलेली नाहीये आणि त्यासोबतच मविआलाच प्रतिऑफर दिली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेवर दिलेला उमेदवार भाजप मागे घेणार नाहीये हे स्पष्ट आहे. आता शिवसेना यावर काय निर्णय घेते हे पहावं लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात