मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Rajya Sabha Election: नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना तूर्तास मतदानाची परवानगी नाही, सत्र न्यायालयाचा निकाल हायकोर्टाकडून कायम

Rajya Sabha Election: नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना तूर्तास मतदानाची परवानगी नाही, सत्र न्यायालयाचा निकाल हायकोर्टाकडून कायम

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान व त्यानंतर सायंकाळी 5 वाजेपासून मतमोजणी होणार आहे.

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान व त्यानंतर सायंकाळी 5 वाजेपासून मतमोजणी होणार आहे.

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान व त्यानंतर सायंकाळी 5 वाजेपासून मतमोजणी होणार आहे.

मुंबई, 10 जून : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी आज निवडणूक (Rajya Sabha Election) प्रक्रिया होत आहे. या निवडणुकीत सहा जागांवर सात उमेदवार रिंगणात आहेत. सहावा उमेदवार विजयी करण्यासाठी आवश्यक असलेली मते कुठल्याच राजकीय पक्षांकडे नसल्याने एक-एक मत अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी लहान पक्ष आणि अपक्षांचीही मदत घेण्यात येत आहे. मात्र, सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) हे दोन आमदार हे अटकेत आहेत. त्यामुळे या आमदारांनाही निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मात्र, सत्र न्यायालयाने मतदानाची परवानगी नाकारली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेण्यात आली. आज या याचिकेवर सुनावणी झाली आणि मुंबई उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे.

उच्च न्यायालयाकडून नवाब मलिकांना मतदानाची तूर्तास परवानगी नाकारण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं दिलेला निकाल हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आला. मात्र नवाब मलिकांना याचिकेत सुधारणा करून पुन्हा दाद मागण्याची परवानगी मागितली. याचिकेतील जामीनाचा मुद्दा काढून केवळ बंदोबस्तात मतदानाची परवानगी देण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर आता थोड्यावेळात नव्या याचिकेसह पुन्हा सुनावणी होणार आहे.

वाचा : राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसने मतांचा कोटा बदलला; मित्रपक्षांमुळे शिवसेनेची गोची

ही याचिका सुनावणीसाठी योग्यच नाही असा दावा सरकारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या महाधिवक्ते अनिल सिंग यांनी न्यायालयात केला. त्यावर नवाब मलिकांच्या वकीलांनी युक्तीवाद करताना म्हटलं, घटनात्मक अधिकार आहे तोच आम्ही मागतोय. आता नवाब मलिक कोठडीत नसून हॅास्पिटलमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना फक्त काही वेळ दिला तर त्यांना त्यांचा घटनात्मक अधिकार वापरता येईल.

नवाब मलिक यांच्या युक्तीवादाकरता ज्येष्ठ वकील अमित देसाई तर अनिल देशमुख यांच्या युक्तीवादाकरता आबाद पोंडा यांनी युक्तीवाद केला. तर सरकारी पक्षाची बाजू महाधिवक्ते अनिल सिंग यांनी मांडली.

वाचा : Rajya Sabha Election: मतांची जुळवाजुळव; भाजप आमदार थेट स्ट्रेचरवरुन विधानभवनात, VIDEO

न्यायालयात नेमकं काय घडलं?

न्यायमूर्ती - आपले अशील न्यायालयीन कोठडीत आहेत

अमित देसाई - इडीच्या अधिका-यांच्या देखरेखीत आणि व्यक्तीगत जातमुचलक्यावर परवानगी द्यावी मतदानाला जाण्यासाठी

न्यायमूर्ती - पण याकरता जामिन द्यावा लागेल ना? सुनावणी योग्य कशी याचे पहिले उत्तर द्या

अमित देसाई - आम्ही काही तासांची सवलत मागत आहोत

न्यायमूर्ती - पण तुमची मागणी सत्र न्यायालयाने फेटाळली आहे

न्यायमूर्ती - ज्या कोर्टाचे तुम्ही कैदी आहात त्यात कोर्टाने तुम्हाला परवानगी नाकारलीये तर आम्ही कशी परवानगी देवू

अमित देसाई - मतदान करणे हा अधिकार आहे त्यामुळे आम्ही कोर्टाला विनंती करतो काही तासाकरता परवानगी द्यावी

अमित देसाई - विधानभवनात मतदान सुरू झालंय आणि मतदानाची वेळ आज दुपारी 4 पर्यंतच आहे. त्यामुळे फार कमी वेळ उपलब्ध आहे.

न्यायमूर्ती - तुम्ही याच मुद्यावर ठाम आहात की, नियमित जामीनासाठी अर्ज करणार?

अमित देसाई - राज्यघटनेच्या अनुच्छेद 226 नुसार हायकोर्टाला विशेष अधिकार आहे त्याचा ते वापर करुन आम्हाला परवानगी देवू शकतात. हा अधिकार कोर्टाने वापरावा अशी आम्ही विनंती करतो

अमित देसाई - लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना अधिक महत्व आहे त्यांनी मतदान करणे गरजेचे आहे

अनिल सिंग विशेष महाधिवक्ता -  या याचिकेत मलिकांनी केवळ तात्पुरत्या जामीनाचा उल्लेख केला आहे. यात बंदोबस्तात मतदानाची परवानगी देण्याचा उल्लेख नाही. ही याचिका सुनावणी योग्यच नाही.

अमित देसाई - घटनात्मक अधिकार आहे तोच आम्ही मागतोय. आता नवाब मलिक कोठडीत नसून हॅास्पिटलमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना फक्त काही वेळ दिला तर त्यांना त्यांचा घटनात्मक अधिकार वापरता येईल.

गुरुवारी सत्र न्यायालयाने मतदानाची परवानगी नाकारली

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध दर्शवला. कैद्यांना मतदानाचा अधिकारच नसल्याचा दावाही ईडीने न्यायालयात केला. बुधवारी (8 जून) दिवसभराच्या युक्तिवादानंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर गुरुवारी न्यायाधीशांनी आपला निर्णय देत मतदानाची परवानगी नाकारली.

नवाब मलिक (Nawab Malik) हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे शंभर कोटी घोटाळ्याच्या आरोप प्रकरणात अटकेत आहेत. ते सध्या कोठडीत आहेत. पण कोठडीत असूनही ते राज्यसभेसाठी मतदान करु शकतील, असा अंदाज बांधला जात होता. पण आता न्यायालयाने त्यांना मतदान करता येणार नसल्याचं म्हटलं.

First published:

Tags: Anil deshmukh, Maharashtra News, Mumbai high court, Nawab malik, NCP, Rajyasabha