जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Rajya Sabha Election: मतांची जुळवाजुळव; भाजप आमदार थेट स्ट्रेचरवरुन विधानभवनात, VIDEO

Rajya Sabha Election: मतांची जुळवाजुळव; भाजप आमदार थेट स्ट्रेचरवरुन विधानभवनात, VIDEO

Rajya Sabha: मतांची जुळवाजुळव; भाजप आमदार थेट स्ट्रेचरवरुन विधानभवनात, VIDEO

Rajya Sabha: मतांची जुळवाजुळव; भाजप आमदार थेट स्ट्रेचरवरुन विधानभवनात, VIDEO

Rajya Sabha Election updates: राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान व त्यानंतर सायंकाळी 5 वाजेपासून मतमोजणी होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 जून : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात (Rajya Sabha Election voting starts) झाली आहे. या निवडणुकीत एक-एक मत खूपच महत्त्वाचे आहे. लहान पक्षांसोबतच अपक्षांची मते मिळवण्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, याच दरम्यान भाजपचे पुण्यातील दोन आमदार (BJP MLA’s) हे आजारी असल्याने त्यांच्या मतदानासाठी उपस्थितीवर प्रश्न उपस्थित होत होते. पण पुण्यातील हे दोन्ही आमदार मतदान करणार आहेत. पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (BJP MLA Mukta Tilak) या गुरुवारी (9 जून) मुंबईत दाखल झाल्या. त्यानंतर आज त्या रुग्णवाहिकेने विधानभवन परिसरात मतदानासाठी दाखल झाल्या. पुण्यातील कसबा पेठच्या भाजप आमदार मुक्ता टिळक या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. मात्र, आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी मुक्ता टिळक यांनी मुंबईत येऊन मतदान करण्याचं ठरवलं. त्यानुसार त्या मुंबईत दाखल झाल्या. आज सकाळी मुक्ता टिळक यांना रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. त्यानंतर स्ट्रेचरवरुन मुक्ता टिळक यांना विधानभवनात मतदानासाठी नेण्यात आले.

या निवडणुकीत शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार संभाजी पवार हा रिंगणात उतरवला आहे. तर भाजपने सुद्धा धनंजय महाडिक यांच्या रुपाने तिसरा उमेदवार रिंगणात उतरवला. मात्र, या उमेदवारांना विजयासाठी आवश्यक असलेली मते दोन्ही पक्षांकडे नसल्याने मतांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू आहे. एक-एक मत अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी जोरदार प्रयत्न होत आहेत. आमदार लक्ष्मण जगताप रुग्णवाहिकेने रवाना तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे सुद्धा गंभीर आजाराने त्रस्त आहेत. ते सुद्धा आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी रुग्णवाहिकेने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात ते मुंबईत दाखल होतील आणि मतदानाचा हक्क बजावतील. राष्ट्रवादी पाठोपाठ आता काँग्रेसने मतांचा कोटा बदलला निवडणुकीत शिवसेनेची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठोपाठ आता काँग्रेसनेही आपल्या निवडणूक स्ट्रॅटेजीत बदल केला आहे. आपल्या पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बदलला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपल्या दोन मतांचा कोटा वाढवला आहे. यामुळे शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचं टेन्शन वाढलं आहे. खबरदारी म्हणून आणि धोका नको म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मतांचा कोटा वाढवला आहे. काँग्रेस आपली सर्वच्या सर्व म्हणजे 44 मते ही आपले उमेदवार इमरान प्रतापगढी यांना देणार आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दोन-दोन मतांचा कोटा वाढवल्याने शिवसेनेच्या उमेदवाराची पहिल्या पसंतीची चार मते कमी होणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात