मुंबई, 10 जून : राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला (Rajya Sabha Election voting) थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत एक-एक मतदान अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आपला उमेदवार विजयी करम्यासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, त्याच दरम्यान महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांत नाराजी असल्याची चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मतांचा कोटा कमी करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. सूत्रांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी ऐनवेळी उमेदवारांसाठीचा मतांचा कोटा बदलला. 42 ऐवजी कोटा बदलून 44 केला आणि त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. मतांचा कोटा 42 वरुन 44 इतका झाल्यास त्याच फटका शिवसेना उमेदवाराला बसेल आणि शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळेच शिवसेनेत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. वाचा : Rajya Sabha: एमआयएमची दोन मते कुणाच्या पारड्यात? अखेर सस्पेन्स संपला, खासदार इम्तियाज जलील यांनी केली घोषणा राज्यसभा निवडणुकसाठी आज मतदान होतंय. त्यासाठी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांचा निर्धारीत विजयी कोटा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल अचानक बदलल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्तं केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा सारवासारव करण्यात येत आहे. महाविकास आघाडीने ठरवल्याप्रमाणे सर्व आमदारांना निर्धारीत विजयी कोटा देण्या संदर्भात पुन्हा चाचपणी करण्यात येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने ठरवल्या प्रमाणे सर्व आमदारांनी त्यांचा मतदानाचा कोटा विधान भवनातील पक्षांच्या बैठकीत जाहीर केला जाईल अशी माहीती सूत्रांनी दिलीय. भाजपचा आत्मविश्वास वाढला तर दुसरीकडे भाजपचा आत्मविश्वास वाढला असल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री औरंगाबादच्या सभेत केलेलं भाषण हे एमआयएमसाठी केलं. मुख्यमंत्री हे सतत एमआयएम, सोनिया गांधी आणि समाजवादी पार्टी किंवा शरद पवार यांच्यावतीनेच बोलत असतात. भाजपच्या तिन्ही जागा निवडून येतील. आम्हाला विजयाचा 100 टक्के नाही तर 110 टक्के विश्वास आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.