मुंबई, 10 जून : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक (Rajya Sabha Election) प्रक्रिया सुरू असून त्यासाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात (voting for Rajya Sabha Election) झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या आमदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात केली. मात्र, त्याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली. ती म्हणजे भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) तीन मतांवर आक्षेप घेत ती मते अवैध ठरवण्याची मागणी केली.
नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मतदान लिहिल्यानंतर मतपत्रिका जयंत पाटील यांच्या हातात दिली. तर मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी सुद्धा मतदान लिहिल्यानंतर मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिली. तसेच आमदार सुहास कांदे यांच्या मतदानावरही आक्षेप घेतला. यावरुनच भाजपने आक्षेप घेतला.
वाचा : BIG BREAKING: मतदानाला काही तास शिल्लक असताना मविआला मोठा झटका
भाजपने आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपचा आक्षेप फेटाळून लावला. सर्व मतं ग्राह्य असल्याचं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं. एकही मत बाद नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची मते ही वैध आहेत. मात्र, आता प्रत्यक्ष मतमोजणीनंतर ही मते बाद की वैध हे ठरणार आहे.
वाचा : Rajya Sabha: 'मविआ'च्या दोन मतांबाबत अखेर फैसला झाला, वाचा काय घडलं कोर्टात
पराग अळवणी यांनी म्हटलं, शिवसेना आमदार सुहास कांदे, मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मतदानावर आमचा आक्षेप आहे. आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहोत. आम्ही निवडणूक आधिकारी यांच्याकडे तक्रार केली मात्र आम्हांला येथे दाद मिळाली नाही तर आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत.
काय म्हणाल्या यशोमती ठाकूर?
भाजपच्या या आक्षेपानंतर मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं, जसं महाराष्ट्राचं वातावरण गढुळ करण्याचं काम भाजपने केलं त्याच पद्धतीने पोलिंग बूथच्या आतमध्ये सुद्धा कन्फ्युजन आणि वातावरण दुषित करण्याचं काम भाजपने केलं. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येणार हे मी तुम्हाला अत्यंत आत्मविश्वासाने सांगतो.
पहिल्या पसंतीची मते कुणाला?
आत्तापर्यंतच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने 42 मते प्रफुल्ल पटेल यांना दिली तर पहिल्या पसंतीची 9 मते ही शिवसेनेच्या संजय पवार यांना दिली. तर काँग्रेसने आपल्या पहिल्या पसंतीची 42 मते इम्रान प्रतापगढी यांना दिली आहेत तर दोन मते शिवसेनेच्या संजय पवार यांना दिली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Election, Jitendra awhad, Maharashtra News, Rajyasabha, Yashomati thakur