..तर कोरोना त्यांच्या जीवावर बेतू शकतो, असं म्हणत राज ठाकरेंनी केली ही मागणी

..तर कोरोना त्यांच्या जीवावर बेतू शकतो, असं म्हणत राज ठाकरेंनी केली ही मागणी

कोरोनाशी लढा देताना ठाण्यातील प्रत्येक अत्यावश्यक विभागातील कर्मचारी झटत आहे. या काळात त्यांच्या जीवावर हा आजार बेतू शकतो.

  • Share this:

ठाणे, 28 एप्रिल: लॅकडाऊनमुळे आधीच महिनाभर ऑनड्युटी असलेल्या ठाणे पालिकेच्या अत्यावश्यक विभागातील सर्वच कर्मचार्‍यांचा 50 लाखांचा विमा तातडीने उतरवण्यात यावा. अशी  मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.  तसेच दर 14 दिवसांनी या कर्मचार्‍यांची विनामूल्य कोरोना चाचणी करावी, अशी विनंतीही प्रशासनाला दिलेल्या निवेदनात मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

कोरोनाशी लढा देताना ठाण्यातील प्रत्येक अत्यावश्यक विभागातील कर्मचारी झटत आहे. या काळात त्यांच्या जीवावर हा आजार बेतू शकतो. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत येणार्‍या खुद्द ठाणे पालिका आयुक्तांसह पालिकेच्या सर्व विभागातील कर्मचारी, परिवहन सेवा, सफाई कर्मचारी, आरोग्य विभाग, पोलीस, पत्रकार, अग्निशमन दल, सुरक्षा कर्मचारी, पाणी विभाग, फायलेरिया आदींच्या कर्मचार्‍यांचा 50 लाखांचा विमा उतरवावा. या विभागात काम करणारे कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांशी वारंवार संर्पकात येतात. त्यामुळे त्यांची दर 14 दिवसांनी कोरोना टेस्ट करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी ठाणे पालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केली आहे.

हेही वाचा..  क्वारंटाउन संपल्यानंतरही रुग्णांची आली धक्कादायक माहिती,केडीएमसीने केला मोठा बदल

दुर्धर आजारांशी लढणार्‍या कर्मचार्‍यांना सक्तीची रजा द्या!

हदयरोग, दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी व्याधींचा सामना करणार्‍या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना सक्तीची भरपगारी रजा प्रशासनाने द्यावी. तसेच 55 वर्षांवरील कर्मचार्‍यांनादेखील घरीच थांबविण्याची मागणी संदीप पाचंगे यांनी प्रशासनाला केली आहे.

दरम्यान, दरम्यान, या आधी मनसेचे नेते बाळा नांदगावर यांनी ट्वीट करत सर्व पत्रकार बंधूंना 50 लाखाचा विमा सरकारने दयावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदय नुकतीच जवळपास 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाली ही बातमी वाचली, कारण ते सुद्धा अत्यावश्यक सेवेत येतात, व स्वतःचे जीव धोक्यात घालून वार्तांकन करतात. या संदर्भात त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे, असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा..असाही एक योद्धा.. स्वत: डायलिसिसवर असून कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये बजावतोय कर्तव्य

<blockquote class="twitter-tweet"><p lang="mr" dir="ltr">माननीय मुख्यमंत्री महोदय<br>नुकतीच जवळपास 52 पत्रकारांना कोरोनाची लागण झाली ही बातमी वाचली, सर्व पत्रकार बंधूंना 50 लाखाचा विमा सरकारने दयावा, कारण ते सुद्धा अत्यावश्यक सेवेत येतात, व स्वतःचे जीव धोक्यात घालून वार्तांकन करतात. या संदर्भात त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे</p>&mdash; Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) <a href="https://twitter.com/BalaNandgaonkar/status/1252206460747919361?ref_src=twsrc%5Etfw">April 20, 2020</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 28, 2020, 5:23 PM IST

ताज्या बातम्या