ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, राज ठाकरेंनी दिला इशारा

ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, राज ठाकरेंनी दिला इशारा

'सरकारवर वचक ठेवण्यासाठी आणि विधायक काम करण्यासाठी हे मंत्रिमंडळ आहे. यात कुणी परस्पर निर्णय घेऊन माध्यमांना सांगू नये.'

  • Share this:

मुंबई 09 मार्च : 'मनसे'च्या बहुप्रतिक्षित शॅडो कॅबिनेटची घोषणा आज झाली. राज्य सरकावर अंकूश ठेवण्यासाठी प्रतिरुपमंत्रिमंडळाची म्हणजेच शॅडो कॅबिनेटची घोषणा केली असल्याचं राज ठाकरे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सांगितलं . ते म्हणाले, 14 वर्ष झाली, प्रवास सुरु आहे, ह्यात माध्यमांनी प्रेम दिलं, बोचरी टीका केली पण हे चालायचंच. काँग्रेसची केंद्रात सत्तेत होती आज दिल्लीत एकही आमदार निवडून नाही आला. हे प्रकार होत असतात. जेंव्हा देशात लाट असते तेंव्हा अनेक पक्षांना पराभव स्वीकारावा लागतो. तरी पण मलाच विचारतात की तुमचा पराभव का झाला? इतक्या चढ उतारानंर देखील तुम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक माझ्यासोबत राहिलात ह्याचा मला आनंद झाला आहे असंही ते म्हणाले.

प्रतिरूप मंत्रिमंडळाच्या बाबतीत पक्षाचे पदाधिकारी नसलात पण तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा. मी तुम्हाला ह्या कामात सहभागी करून घेईन असंही त्यांनी सांगितलं. सरकारवर वचक ठेवण्यासाठी आणि विधायक काम करण्यासाठी हे मंत्रिमंडळ आहे. यात कुणी परस्पर निर्णय घेऊन माध्यमांना सांगू  नये, कारण नसताना वाभाडे काढू नका, कुणी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा असा इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिला. काही लोक RTIचा वापर फक्त ब्लॅकमेल करण्यासाठीच करत असतात अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

हे वाचा -  VIDEO : जिगरबाज संयाजी शिंदे! डोंगरावर लागलेली आग विझवताना सांगितला थरारक अनुभव

नवी मुंबईत पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पक्षाचे नेते अनिल शिदोरे यांनी ही घोषणा केली. त्यात पक्षाच्या महत्त्वाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना सामावून घेण्यात आलं आहे. येत्या एप्रिल मध्ये नवी मुंबईत महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करून आपला भगवा झेंडा राज्यभर नेऊया असं आवाहन बाळ नांदगावकर यांनी यावेळी बोलताना केलं. राजसाहेबांची वाणी तलवारीसारखी चालत असते आणि त्या वाणीच्या आदेशानुसार महाराष्ट्र सैनिक देखील धारधार कामगिरी करूया असंही त्यांनी सांगितलं.

असं आहे मनसेचं शॅडो कॅबिनेट

वित्त आणि गृहनिर्माण - नितीन सरदेसाई

जलसंपदा अनिल शिदोरे

गृह, विधी व न्याय, सामान्य प्रशासन बाळा नांदगावकर

महसूल आणि परिवहन - अविनाश अभ्यंकर

सहकार आणि पणन - दिलीप धोत्रे

सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण - रिटा गुप्ता

शालेय उच्च शिक्षण - अभिजित पानसे

नगर विकास आणि पर्यटन - संदिप देशपांडे , अमित ठाकरे

हे वाचा - कोरोनाचा झाला धंदा, पैसे कमवण्यासाठी पुण्यात चोरले 35 हजारांचे मास्क

कामगार - राजेंद्र वागसकर , गजानन राणे , सुरेंद्र सुर्वे

वने आपत्ती व्यवस्थापन , मदत पुनर्वसन - अमित ठाकरे , संजय चित्रे , संतोष धुरी

ग्रामविकास - अमित ठाकरे

उर्जा - शिरीष सावंत , सागर देवऱह

सांस्कृतिक कार्य - अमेय खोपकर

रोजगार हमी आमि फलोत्पादन - बाळा शेडगे

सार्वजनिक उपक्रम - संजय शिरोडकर

सार्वजनिक बांधकाम - योगेश परुळेकर

सामाजिक न्याय - गजानन काळे

हे वाचा - मराठीत भाषण न केल्याने शिवसेनेकडून अपमान, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या झेनचा आरोप

महिला बालविकास - शालिनी ठाकरे , सुनीता चुरी

अन्न नागरी पुरवठा - राजा चौघुले

उत्पादन - वसंत फडके

आदिवासी विकास - आनंद एंबडवार

पर्यावरण - रुपाली पाटील, किर्तीकुमार शिंदे, देवव्रत पाटील

पाण पुरवठा - अरविंद गावडे

केतन जोशी - सामान्य प्रशासन आणि इतर महत्त्वाचे विभाग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2020 01:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading