पुणे, 09 मार्च : पुण्यातल्या कात्रज बोगद्याजवळच्या डोंगरावर असलेल्या झाडांना आग लागली होती. हा वणवा तिथून जाणाऱ्या अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाहिला. मग तात्काळ त्यांनी गाडीतून खाली उतरत आपल्या सहकाऱ्यांसह वणवा विझवण्यासाठी पुढाकार घेतला. आगीचे स्वरूप जास्त वाढून इतर झाडांचे नुकसान होऊ नये म्हणून सयाजी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी आग विझवली