पुणे, 09 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे (CoronaVirus) जगभरात सध्या चिंतेचे वातावरण आहे. भारतात सध्या 41 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी N-95 मास्कची मागणी वाढली आहे. तर, पुण्यात याच कोरोनाचा वापर पैसे कमवण्यासाठी केला जात आहे. पुण्यात एका नामांकित रुग्णालयाच्या मेडिकलमध्ये सुमारे 35 हजार रुपयांचे मास्क चोरल्याचे समोर आले आहे. याआधी बऱ्याच ठिकाणी जास्त किंमतीला मास्क विकत असल्याचे आरोप केले जात आहेत.
कोरेगाव पार्क पोलिस स्थानकातील अधिकाऱ्यांनी, शनिवारी रुग्णालयातील दवाखान्यातून मास्क, इंजेक्शन्स, गोळ्या आणि मलम चोरुन नेण्यात आले आहेत, असे सांगितले. या प्रकरणी मेडिकल चालकावर IPC अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा-कोरोनामुळे ठाकरे सरकार करणार IPL रद्द? ‘या’ दिवशी होणार फैसलाN-95 मास्कसाठी लागणार डॉक्टरांची चिठ्ठी
एकीकडे कोरोनाला आळा बसण्यासाठी N-95 मास्कचा वापर वाढला आहे. तर, याबाबत आता मात्र राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकराच्या अन्न आणि औषध प्रशासनाने N-95 मास्कच्या विक्रीवर निर्बंध आणले आहेत. करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘मास्क’ची साठेबाजी रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क देण्यात येणार नाही आहेत. औषध विक्रेत्यांनी याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनाव्हायरसची वाढता संसर्ग पाहता मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाचा-कोरोनाची भीती कायम, सेलिब्रिटी कपलवर आली लग्न पुढे ढकलायची वेळकोरोनाच्या धक्क्याने झाला तरुणाचा मृत्यू
कोरोना व्हायरसनं भारतात शिरकाव केला असून आतापर्यंत रुग्णाची संख्या 40वर पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मधुमेह असणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. त्याचं कारण म्हणजे कोरोनामुळे मृत्यू झाला की नाही याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही परंतु सौदी अरेबीयातून हा तरुण भारतात आल्यानंतर त्याला कोरोना व्हायरसची लक्षण दिसत होती. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तरुणाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र रिपोर्ट येण्याआधीच या तरुणाचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे तर या तरुणाचा मृत्यू झाला नाही ना? अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. मात्र रिपोर्टनंतर याबाबत नेमका मृत्यू कशामुळे झाला हे समजू शकेल.
वाचा-शेअर मार्केटमध्ये जबरदस्त घसरण, सेन्सेक्स 1400 आणि निफ्टी 400 अंकानी पडला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.