मुंबई, 22 नोव्हेंबर : महापौरांच्या निवासस्थानासाठी दिल्या जाणाऱ्या जागेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली आहे. 'बाळासाहेबांच्या नावावर कुणासाठी तरी बंगला गिळला जातोय, उद्या हे राजभवन मागतील,' असं म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशााणा साधला आहे.
शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जाग देण्याचा निर्णय महानगरपालिकेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे महापौरांच्या निवासस्थानासाठी नवीन जागा दिली जाणार आहे. ही नवीन जागा देण्यास आता मनसेनं विरोध केला आहे.
'महापौरांच्या निवासस्थानासाठी नवीन जागेवर कोणत्याही परिस्थिती बंगला बांधू देणार नाही. स्मारकासाठी महापौर बंगला देणे, असे पायंडे पाडणं चुकीचं आहे. अनेक बिल्डरांना अनेक भूखंड वाटले गेले आणि बाळासाहेबांच्या स्मारकासाठी तुम्हाला एखादी जागा मिळत नाही?' असा सवाल करत राज यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
'जिमखान्याची जागा निवासस्थानासाठी घेऊ देणार नाही'
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगला घेतल्यानंतर महापौर निवासस्थानाच्या अनेक जागा बदलल्या. कधी राणीची बाग तर कधी आणखी कुठे,आणि आता जिमखान्याची जागा महापौर निवासस्थानासाठी देण्याचा प्रयत्न सुरुय. हे आम्ही होऊ देणार नाही. खेळाची जागा निवासस्थानासाठी देऊ नये, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.
'मग कोर्टाचा उपयोग काय?'
'फेरीवाल्यांचा विषयबाबतही मी आयुक्तांशी बोललो आहे. फेरीवाले आता पुन्हा बसायला लागले आहेत. महापालिकेचे कर्मचारी कोर्टाचेही आदेश मानत नाहीत, तर मग कोर्टाचा उपयोग काय, असा संपप्त सवाल राज यांनी उपस्थित केला आहे. सगळे वॉर्ड ऑफिसर हे पैसे घेऊन फेरीवल्यांना बसू देतात, असा आरोपही राज यांनी केला आहे.
VIDEO : 'वुई वाँट मुंढे'च्या घोषणेत मुंढेंची पालिकेत एंट्री
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.