मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

महाराष्ट्राच्या राजकारणाचे सुखद चित्र, पुन्हा एकदा ठाकरे बंधू आले एकत्र, निमित्त...

महाराष्ट्राच्या राजकारणाचे सुखद चित्र, पुन्हा एकदा ठाकरे बंधू आले एकत्र, निमित्त...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पूर्वी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पूर्वी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पूर्वी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर ...

मुंबई, 05 एप्रिल : राज्यात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी कडक निर्बंध लावण्याआधी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एकत्र आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आज संध्याकाळी सहा वाजता झूम मीटिंग या अॅपच्या माध्यमातून संवाद साधला.ही मिटिंग सुमारे 15 ते 20 मिनिटे चालली असल्याची माहिती मिळत आहे.

राज्य शासनाने रविवारी जाहीर केलेल्या कठोर निर्बंध यांना राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे. तरीही राज ठाकरे यांनी काही सूचना केलेल्या असल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पूर्वी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर कठोर निर्बंध बाबत माहिती जाहीर झाली. परंतु, राज्य शासनाने केलेल्या निर्बंधामध्ये राज ठाकरे यांनी काही सुधारणा सुचवल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांची नैतिकता कुठं गेली? नितेश राणेंची टीका

विशेष म्हणजे, राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची चर्चा सुरू असताना सत्ताधारी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह भाजप नेत्यांनी लॉकडाऊनला विरोध केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुवर्णमध्य काढत सर्व राजकीय नेत्यांशी संवाद साधला.

49 रन्सवर कॅच घेतला म्हणून फलंदाजाने फील्डरला केली जबरी मारहाण,खेळाडू गंभीर जखमी

भाजपचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर संवाद साधला होता. त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही फोन करून संवाद साधला होता. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यात कडक निर्बंध लावले जातील याबद्दल सहकार्य असू द्या, अशी विनंती केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनीही पत्रक काढून सरकारी नियमांचे सर्वांनी पालन करावे, असं आवाहन केले होते. कोरोनाच्या परिस्थितीच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र पाहण्यास मिळाले आहे.

First published: