मुंबई, 05 एप्रिल : अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर (home minister Anil Deshmukh resignation) राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. भाजपसह विरोधकांनी सरकारवर या मुद्द्यावरून हल्लाबोल सुरू केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावरही यामुळं टीका होते आहे. मग अशा वेळी राणे कुटुंब (narayan Rane son niten rane) उद्धव ठाकरेंना टोला लगावण्यात कसं मागे राहणार. अनिल देशमुख यांनी राजीनामा देताच नारायण राणे आणि नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत टोमणा मारला.
नैतिकता फक्त अनिल देशमुखांकडेच आहे अस दिसतय.. ज्याना परमवीर सिंह ने 100 कोटी बद्दल माहिती दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय ? मीठी नदीत तर शोधायला लागणार नाही ना ??
— nitesh rane (@NiteshNRane) April 5, 2021
वाचा - अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर कंगना रणौतचा निशाणा; 'तो' VIDEO पुन्हा व्हायरल
अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याची बातमी येताच, या माध्यमातून नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या आधारावर पदावर राहणं योग्य नसल्याचं म्हणत राजीनामा दिली. त्याचाच आधार घेत नितेश राणेंनी टीका केलीय. ' नैतिकता फक्त अनिल देशमुख यांच्याकडेच आहे, असं दिसतंय. ज्याना परमवीर सिंह ने 100 कोटी बद्दल माहिती दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय? मीठी नदीत तर शोधायला लागणार नाही ना ??' अशा शब्दांत नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री कधी राजीनामा देणार असाच सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
वाचा - Anil Deshmukh resign : अनिल देशमुख दिल्लीला जाणार, सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावणार
नितेश राणेंचे वडील आणि भाजप खासदार नारायण राणे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी कारवाई केली नाही, याचा अर्थ या 100 कोटी खंडणीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही संबंध आहे. वाझेंना वाचवायचंही काम उद्धव ठाकरे करतात. मुख्यमंत्र्यांचा सर्व घटनांशी थेट संबंध आहे. त्यामुळे त्यांनी त्वरित राजीनामा देणं आवश्यक आहे, असं नारायण राणेंनी आदधीच म्हटलंय. त्यानंतर आता पुन्हा ट्विट करत मुख्यमंत्री राजीनामा का देत नाही, असा सवाल केलाय.
या केसशी संबंधित असलेल्या वाझेंना उघडपणे पाठीशी घालणारे मुख्यमंत्री प्रतिक्रिया का देत नाहीत किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाहीत? (२/२) #AnilDeshmukh #ParamBirSingh @CMOMaharashtra
— Narayan Rane (@MeNarayanRane) April 5, 2021
शिवसेना, शिवसेना नेते आणि त्यातही ठाकरे कुटुंबातील सदस्यांवर राणे कुटुंबीय नेहमी जहरी टीका करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात आता या प्रकरणानंतर राज्यात सत्तेतील विरोधक आणि मुख्यमंत्री पदावर असलेल्या ठाकरे कुटुंबीयांचेही विरोधक असल्यानं राणे कुटुंबीय या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narayan rane, Nitesh rane, Uddhav thackeray