Home /News /crime /

49 रन्सवर कॅच घेतला म्हणून फलंदाजाने फील्डरला केली जबरी मारहाण, खेळाडू गंभीर जखमी

49 रन्सवर कॅच घेतला म्हणून फलंदाजाने फील्डरला केली जबरी मारहाण, खेळाडू गंभीर जखमी

क्रिकेटमध्ये स्लेजिंग, बाचाबाची, एकमेकांची कॉलर पकडणं अशी भांडणं आपण पाहिली असतील. काही वेळा फलंदाजाचं शतक किंवा अर्धशतक हुकतं, त्यावेळी फारफार तर तो किंवा ती मैदानावर जोरदार बॅट आपटतात किंवा गंभीर चेहऱ्याने पॅव्हेलियनमध्ये परततात. मात्र ग्वाल्हेरमधील एका घटनेने या खेळाला गालबोट लागलं आहे.

पुढे वाचा ...
    ग्वाल्हेर, 05 एप्रिल: क्रिकेटच्या (Cricket) मैदानावर भांडणं होणं ही फार सामान्य गोष्ट आहे. मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धांपासून गल्ली क्रिकेटपर्यंत भांडणं हा खेळाचा एक जणू भागच असतो. मग स्लेजिंग, बाचाबाची, एकमेकांची कॉलर पकडणं हा प्रकार घडतोच. काही वेळा फलंदाजाचं शतक किंवा अर्धशतक हुकतं, त्यावेळी फारफार तर तो किंवा ती जोरदार मैदानावर बॅट आपटतात किंवा गंभीर चेहऱ्याने पॅव्हेलियनमध्ये परततात. मात्र ग्वाल्हेरमधील एका घटनेने या खेळाला गालबोट लागलं आहे.  मध्य प्रदेशातील या फलंदाजाने अर्धशतक हुकलं म्हणून फील्डरला गंभीर (Fielder Beaten by Batsman) जखमी होईपर्यंत मारलं आहे. त्याला इतका मार लागला आहे की त्या फील्डरला रुग्णालयात भरती करावं लागलं होतं. सोमवारी उशिरापर्यंत त्या फील्डरला शुद्ध आली नव्हती. ही घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर याठिकाणी झालेल्या क्रिकेट सामन्यादरम्यानची आहे. या सामन्यात अर्धशतक गाठत असलेला फलंदाज 49 धावांवर झेलबाद झाला. त्याने या रागाच्या भरात मैदानावरच फील्डरला बॅटने मारत गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना क्रिकेटच्या मैदानावर घडली. शहर पोलीस अधीक्षक रामनरेश पचौरी यांनी रविवारी अशी माहिती दिली की शनिवारी गोला मंदिर पोलीस स्टेशन परिसरातील मेला ग्राउंडवर क्रिकेट सामन्यादरम्यान ही घटना घडली. (हे वाचा-सोशल मीडियावर झालं प्रेम; वकीलाने घरी बोलावून युवतीवर अनेकदा केला बलात्कार) शहर पोलीस अधिक्षक रामनरेश पचौरी यांनी अशी माहिती दिली की, सचिन पराशर (वय 23) या खेळाडूची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्याला सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून फलंदाज संजय पालियावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पचौरी यांनी अशी माहिती दिली आहे की, 'पराशरने जेव्हा 49 धावांवर त्याला झेलबाद केले, तेव्हा त्याला राग आला कारण अर्धशतक होण्यापासून तो केवळ 1 रन दूर होता. पालिया धावतच पराशरच्या दिशेने आला आणि त्याला त्याने डोक्यावर मारण्यास सुरुवात केली. अन्य खेळाडूंनी पालियाला थांबवण्याचा प्रयत्न केला' (हे वाचा-PAK vs SA : फखर जमानच्या रन आऊटमुळे वाद, पाहा 'फेक फिल्डिंग'चे नियम) पोलीस अधिक्षकांनी अशी माहिती दिली की, 23 वर्षीय हा आरोपी या घटनेनंतर पसार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पालियाविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Cricket, Cricket news, Crime, Crime news

    पुढील बातम्या