जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Raj Thackeray यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली; 75000 मनसैनिकांना नोटीस तर आज नवी 'राज'गर्जना

Raj Thackeray यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली; 75000 मनसैनिकांना नोटीस तर आज नवी 'राज'गर्जना

राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली; 75 हजार मनसैनिकांना नोटीस तर आज नवी 'राज'गर्जना

राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली; 75 हजार मनसैनिकांना नोटीस तर आज नवी 'राज'गर्जना

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर आणि अल्टिमेटमुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 मे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भात भूमिका घेतली. इतकीच नाही तर राज ठाकरेंनी 4 मे पर्यंतचा अल्टिमेटम सुद्धा दिला. औरंगाबादमधील सभेत राज ठाकरे यांनी 4 मे पासून मशिदीवरील भोंगे बंद नाही झाले तर मशिदींसमोर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa)  लावावी, असे आदेश कार्यकर्त्यांना केले. राज ठाकरेंनी दिलेल्या या अल्टीमेटम नंतर गृहविभागही अलर्ट झाले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात राज ठाकरेंनी भूमिका घेतल्याने वातावरण चांगलेच तापले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त कऱण्यात येत आहे. त्यामुळेच मुंबई पोलिसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ (Shivtirth) या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ केली आहे. 75 हजार मनसैनिकांना नोटीस राज ठाकरे यांनी 4 मे पासून मशिदीवरील भोंगे बंद नाही झाले तर मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवावी, असे आदेश कार्यकर्त्यांना केले आहे. राज्यभरातील तब्बल 75 हजार मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. वाचा :  राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेबाबत पोलिसांचा अहवाल तयार, उद्या निघणार कारवाईचा आदेश? शिवतीर्थावर पुढील रणनिती मनसैनिकांना पोलिसांनी बजावलेल्या नोटीस संदर्भात मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी म्हटलं, मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. अनेकांना पोलिसांनी मुंबई बाहेर थांबा असं म्हटलं आहे, हे सर्व घाबरले आहेत म्हणून कारवाईची भीती दाखवत आहेत. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. हनुमान चालीसा म्हणू नका महाआरती म्हणू नका म्हणून आम्हाला नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. आम्ही हिंदुस्थानात आहोत की पाकिस्तानात? आज शिवतीर्थवर महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होईल आणि त्यात पुढील रणनिती ठरेल. औरंगाबादच्या सभेनंतर राज ठाकरेचं पहिलं ट्विट मनसेकडून 3 मे रोजी महाआरती आणि हनुमान चालीसाचं पठण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण तो कार्यक्रम एकदिवस पुढे ढकलण्यात आला. हीच बातमी ताजी असताना राज ठाकरे यांनी ट्विट करत आपली महत्त्वाची भूमिका मांडली आहे. राज ठाकरेंनी या ट्विटमध्ये महाराष्ट्र सैनिकांसाठी मोलाची सूचना दिली आहे. “उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षय्य तृतीया आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करु नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माझ्या ट्विटरद्वारे आपल्यासमोर मांडेन”, असा संदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना ट्विटरवरुन दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात