Home /News /mumbai /

मनसेचा पार पडला मेळावा, राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले नवे आदेश

मनसेचा पार पडला मेळावा, राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले नवे आदेश

 राज ठाकरे एक पत्रक देणार आहे. हे पत्र सर्व कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याची सूचना करण्यात आली आहे.

राज ठाकरे एक पत्रक देणार आहे. हे पत्र सर्व कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याची सूचना करण्यात आली आहे.

राज ठाकरे एक पत्रक देणार आहे. हे पत्र सर्व कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याची सूचना करण्यात आली आहे.

    मुंबई, 28 मे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (mns raj thackery) कामाला लागले आहे. आज त्यांनी मुंबई मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा (mns workers rally) घेतला. यावेळी सरचिटणीस आणि उपाध्यक्षांना राज्यभरात दौरा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसंच, राज ठाकरे एक पत्रक देणार आहे. हे पत्र सर्व कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याची सूचना करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज पदाधिकारी मेळावा पार पडला.  मुंबईतील वांद्रे रंगशारदा इथं हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात  राज्यभरातून मनसे पदाधिकारी रंगशारदाला पोहचले होते. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना 25 मिनिटं मार्गदर्शनं केलं. या मेळाव्यानंतर बाळा नांदगावकर यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 'आजचा मेळावा हा संपूर्ण पदाधिकाऱ्यांचा होता. फक्त तीन कारणांसाठी आयोजित केला होता. लवकरच सर्व नेते मंडळीच्या राज्यभर दौरा चालू होणार आहे.  सरचिटणीस आणि उपाध्यक्ष राज्यभर दौरा करणार आहे.  राज्यभर दौरा सुरू असताना  राज्यभरात सदस्य नोंदणी केली जाणार आहे, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. ( मोठी बातमी: प्रवाशांनी भरलेली बस पलटली, अपघातात 25 जण जखमी) तसंच राज ठाकरे एक पत्र देणार आहे. ते पत्र प्रत्येक कार्यकर्ता हा घरोघरी जाऊन देणार आहे. हे पत्र तिन्ही भाषेत असणार आहे. मराठी ,हिंदी आणि इंग्रजी भाषेत आहे. हे पत्र तयार झाले आहे असून हिंदी आणि इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणे चालू आहे, असंही नांदगावकर म्हणाले. ('गुलाब नाम सुनकर फ्लावर समजे क्या?, मॅंगो हैं मँगो', वाचा, काय आहे हा प्रकार?) 'लवकरच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या