मराठी बातम्या /बातम्या /देश /

मोठी बातमी: प्रवाशांनी भरलेली बस पलटली, अपघातात 25 जण जखमी

मोठी बातमी: प्रवाशांनी भरलेली बस पलटली, अपघातात 25 जण जखमी

बसमधील 25 प्रवासी जखमी झाले. जखमींना उधमपूर (Udhampur) येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बसमधील 25 प्रवासी जखमी झाले. जखमींना उधमपूर (Udhampur) येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बसमधील 25 प्रवासी जखमी झाले. जखमींना उधमपूर (Udhampur) येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • Published by:  Pooja Vichare

श्रीनगर, 28 मे: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) शनिवारी सकाळी मोठी दुर्घटना (Major Accident) घडली. जम्मूहून डोडा (Jammu to Doda District) जिल्ह्यात येणारी बस शुक्रवारी उधमपूरच्या बत्तल बालियान (Batal Balian area of ​​Udhampur) भागात पलटली. बसमधील 25 प्रवासी जखमी झाले. जखमींना उधमपूर (Udhampur) येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर इतर सहा गंभीर जखमी प्रवाशांना जम्मू येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले.

जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. हा रस्ता अपघात कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या पोलीस अपघाताच्या तपासात गुंतले आहेत. ड्रायव्हरला झोपेमुळे बस कंट्रोल करता आली नसावी, त्यामुळे हा अपघात झाला असावा, असे पोलिसांचे म्हणणं आहे.

विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस रोडवेजच्या बसला धडकली, अनेक जखमी

त्याच वेळी, हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील ब्राह्मणवास गावाजवळ स्कूल बस आणि रोडवेज बस यांच्यात झालेल्या धडकेत 13 मुले जखमी झाली. जखमींना सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले तेथून तीन विद्यार्थ्यांना पीजीआय रोहतकमध्ये पाठवण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी एक खाजगी शाळेची बस विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी जात असताना जींद-रोहतक मार्गावर रोहतक बाजूने येणाऱ्या रोडवेजच्या बसला धडक बसली, या अपघातात 13 मुले जखमी झाली, पोलिसांनी सांगितले.

First published:

Tags: Accident, Jammu and kashmir, Private bus