Home /News /agriculture /

'गुलाब नाम सुनकर फ्लावर समजे क्या?, मॅंगो हैं मँगो', औरंगाबादमध्ये निजामकालीन 'या' आंब्यांना खवय्यांची पसंती

'गुलाब नाम सुनकर फ्लावर समजे क्या?, मॅंगो हैं मँगो', औरंगाबादमध्ये निजामकालीन 'या' आंब्यांना खवय्यांची पसंती

title=

औरंगाबाद शहरातील हिमायत बागमध्ये गुलाब खास (Gulab Khas Mango) आणि लीली (Lily Mango Aurangabad) नावाचे दोन आंबे आले आहे. साखरेसारखा गोड असलेल्या आंब्यांना खवय्यांकडून मोठी मागणी केली जात आहे.

  औरंगाबाद, 28 मे : 'गुलाब नाम सुनकर फ्लावर समजे क्या?, मॅंगो हैं मँगो' चित्रपटामध्ये मारला गेलेला हा डायलॉग (Dialogue) ऐकू आल्यास आश्चर्यचकित होऊ नका. औरंगाबाद शहरातील निजामकालीन हिमायत बागमध्ये (Himayat Bag Aurangabad) तुम्ही गेलात तर हा डायलॉग तुमच्या कानावर पडू शकतो. तुम्ही जर खवय्ये असाल तर... औरंगाबाद शहरातील हिमायत बागमध्ये गुलाब खास (Gulab Khas Mango) आणि लीली (Lily Mango Aurangabad) नावाचे दोन आंबे आले आहे. साखरेसारखा गोड असलेल्या आंब्यांना खवय्यांकडून मोठी मागणी केली जात आहे. यामुळे या आंब्याची मोठी चर्चा औरंगाबाद शहरात होत आहे. तुम्ही जर खवय्ये असाल आणि तुम्हाला या गुलाब खास आणि लीली नावाच्या आंब्याची चव चाखायची असेल तर तुम्हाला यासाठी हिमायत बागमध्ये याची चव चाखता येऊ शकते. या प्रकारचे आहेत आंबे... आंब्यांच्या बाजारांमध्ये आंबे खरेदीसाठी आपण गेल्यास चार ते पाच प्रकारचे आंबे दिसतात. मात्र, हिमायत बागेत निजामकालीन स्वादानुसार अनेक प्रकारचे आंबे दिसतात. गुलाब खास, लीली, राजापरी, मलगोबा, लंगडा हुर, रत्ना दशहेरी, काला पाड, खोबरा, दिलपसंद, दोरी, आमलेट, मोरसीदाबाद, आगरबत्ती, बदाम, केशर हापूस, चिनी मलगोबा, वनराज, मालोदा, आल्फाम, हिमावत, शक्करगोटी, निरंजन इत्यादी आंब्यांचा समावेश आहे. हेही वाचा - नॅचरल पद्धतीनं बॉडी डिटॉक्स करण्याची ही आहे सर्वात सोपी पद्धत; जाणून घ्या फायदे
  गुलाब खास हे निजामकालीन वाण -
  निजामाच्या काळात तयार करण्यात आलेल्या या हिमायत बागमध्ये गुलाब खास नावाचं निजामकालीन आंब्याचे वाण आहे. या गुलाब खास आंब्याला गुलाबी छटा आपल्याला बघायला मिळतात. गुलाब खास या आंब्याचे वजन हे 250 ते 300 ग्रॅमपर्यंत असते. या आंब्याला विभागात पुष्करतर आईस्क्रीमसारखा स्वाद येतो. त्याचप्रमाणे लीली हे मूळचे इस्राईल येथील आंबे आहेत. लिली या आंब्याच्या प्रकाराला निळसर रंगाची छटा असते.
  First published:

  Tags: Aurangabad News, Fruit

  पुढील बातम्या