• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • raj thackeray corona positive : राज ठाकरेंना लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, 'कृष्णकुंज'कडे रवाना

raj thackeray corona positive : राज ठाकरेंना लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, 'कृष्णकुंज'कडे रवाना

आरोग्य चाचणी पूर्ण करून राज ठाकरे हे कृष्णकुंज बंगल्याकडे रवाना झाले आहे.

आरोग्य चाचणी पूर्ण करून राज ठाकरे हे कृष्णकुंज बंगल्याकडे रवाना झाले आहे.

आरोग्य चाचणी पूर्ण करून राज ठाकरे हे कृष्णकुंज बंगल्याकडे रवाना झाले आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 ऑक्टोबर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये ( Lilavati Hospital mumbai) उपचार करण्यात आले आहे. उपचाराअंती राज ठाकरे आणि त्यांची मोठी बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे यांना लीलावती हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. (Raj Thackeray corona test positive) राज ठाकरे यांच्या घरी कोरोनाने शिरकाव केला. राज यांच्या आई आणि बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे यांना कोरोनाची लागण झाली होती. राज ठाकरे आणि त्यांच्या बहिणीची कोरोनाची चाचणी आज पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे दुपारी ते लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार पूर्ण झाल्यानंतर रात्री घरी सोडण्यात आले आहे.  आरोग्य चाचणी पूर्ण करून राज ठाकरे हे कृष्णकुंज बंगल्याकडे रवाना झाले आहे. VIDEO : माझा होशील ना मालिकेतील आदित्य सध्या करतोय 'हे' काम दरम्यान, लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, राज यांच्या आईंची तब्येत आता ठीक असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहे. राज ठाकरे यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहे. ताप कमी झाला आहे, खोकल्याचा कोणताही त्रास त्यांना नाही. श्वास घेण्यासाठीही कोणताही त्रास त्यांना जाणवत नाही. हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर  त्यांना घरी सोडण्यात आले आहे. भारत-पाकिस्तान T20 मॅच पाहण्यासाठी 3GB नेटपॅक; रोमांच मिस करू नका हे आहेत Plans राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांना कोविड-19 संसर्गाची लागण झाली आहे. सौम्य ताप आणि लक्षणं दिसून आल्यामुळे शुक्रवारी कोविड 19 संसर्गाची चाचणी करण्यात आली होती. त्यात त्यांचा रिपोर्ट  पॉझिटिव्ह आला होता. राज ठाकरे यांच्या मोठी बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे यांची सुद्धा कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली.  मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन दरम्यान, राज यांच्यासह त्यांच्या आई आणि बहिणीला कोरोनाची लागण झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी राज ठाकरे यांना फोन केला होता. मुख्यमंत्र्यांनी राज यांच्या तब्येतीची विचारपूस केली.  त्याचबरोबर राज यांच्या आई आणि बहिण जयंवती ठाकरे देशपांडे यांच्या प्रकृतीचीही विचारपूस केली. ठाकरे कुटुंबातला हा भावनिक क्षण होता. राजकीय मतभेद दूर ठेवून दोन्ही भाऊ आज एकत्र आल्याचे पाहण्यास मिळाले.
  Published by:sachin Salve
  First published: