मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO : Maza Hoshil Na मालिकेतील आदित्य सध्या करतोय 'हे' काम

VIDEO : Maza Hoshil Na मालिकेतील आदित्य सध्या करतोय 'हे' काम

माझा होशील ना  (Maza Hoshil Na )या मालिकेतून विराजस कुलकर्णी महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला. सध्या तो काय करत आहे याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.

माझा होशील ना (Maza Hoshil Na )या मालिकेतून विराजस कुलकर्णी महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला. सध्या तो काय करत आहे याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.

माझा होशील ना (Maza Hoshil Na )या मालिकेतून विराजस कुलकर्णी महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला. सध्या तो काय करत आहे याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई. 23 ऑक्टोबर : माझा होशील ना (Maza Hoshil Na )या मालिकेतून विराजस कुलकर्णी ( virajas kulkarni) महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला. मालिकेत त्याने साकारलेला आदित्य प्रेक्षकांना विशेष भावला होता. आजोबा जयराम कुलकर्णी आणि आई मृणाल कुलकर्णी यांच्या अभिनयाचा वारसा विराजस पुढे चालवत असला तरी त्याच्याकडे मल्टीटॅलेंटेड व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जाते. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर त्याच्या या  व्हिडिओचे  (puppet slappy) कौतुक होत आहे. याशिवाय तो का मल्टीटॅलेंटेड आहे हे देखील यातून समोर येते. अभिनयाव्यतरिक्ती तो काय करतो याचे दर्शन यातून होते.

विराजसने त्याच्या इन्स्टावर बोलका बाहुला Slappy सोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात विराजस शब्दभ्रम करून स्लॅपीला बोलतं करताना दिसत आहे. कुणालाच कळू न देता विराजस इतकं सराईतपणे त्या बहुल्याला बोलतं करतोय की पाहणाऱ्यालाही हा बाहुलाच बोलत असावा असा भास होतो आहे. विराजसचं हे टॅलेंट खरोखर कौतुकास्पद म्हणावं लागेल कारण त्याच्या ह्या व्हीडीओला सोशल मीडियावर पसंती देखील मिळत आहे.

विराजस कुलकर्णीने व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल मधून फिल्म मेकिंगचे धडे गिरवले आहेत. यासोबतच उषा गांधी मॅनेजमेंटमधून त्याने जाहिरात क्षेत्रात बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी मिळवली आहे. कॉलेजमध्ये असताना अनेक नाट्यस्पर्धां त्याने आपल्या अभिनयाने गाजवल्या आहेत. यातील काही नाटकांच्या दिग्दर्शन आणि लेखनाची जबादारी देखील त्याने सांभाळली होती.

वाचा, करिना कपूरचा हा थ्रोबॅक फोटो तुम्ही पाहिलाय का?नवव्या वर्षी झाली सलमानशी भेट

वेबसिरीज असो वा नाटक अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्याने अभिनयासोबतच लेखन आणि दिग्दर्शन अशा भूमिका बजावल्या आहेत. विराजसला सर्वजण उत्तम अभिनेता म्हणून आपण ओळखतोच मात्र त्याने रमा माधव याच चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी त्याने सांभाळली होती. या चित्रपटची दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांनी केलं होतं. आता यामध्ये त्याच्या आणखी एका कलेची वाढ झाली आहे ते म्हणजे बोलक्या बाहुल्यांना बोलते करणे.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Tv serial, Zee marathi serial