यानंतर काही वेळातच चित्रा वाघ यांनी संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. तपासात गडबड आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टानंच दिल्याचं चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं. हे उत्तर देताना चित्रा वाघ यांनीही संजय राऊत यांना त्यांच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिलं. संजय राऊतांनी एसीपी प्रद्युम्नचा डायलॉग मारला तर चित्रा वाघ यांनाही टिव्ही मालिकेत गाजलेल्या भाभीजीचा, सही पकडे है... हा डाय लॉग आठवला आणि त्यांनी लगेचच तसं प्रत्युत्तर दिलं.कुछ तो गडबड है... मा.उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला सांगीतले होते. अनिल देशमुखावर धाडी. एफ.आय. आर..वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही.दया..कुछ तो गडबड जरूर है.
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 24, 2021
चित्रा वाघ यांनी यावेळी सत्ताधारी महाविकास आघाडीवर राऊतांच्या ट्विटला धरूनही टीका केली. गडबड केली म्हणूनच #CBI आली बडबड न करता न्यायालयाचा आदेश व्यवस्थित वाचावा जेणेकरून न्यायव्यवस्थेची तर्कसंगतेचा आपणास बोध होईल, असं म्हणत त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे फोटो पोस्ट केले. तसंच जर कुणी काही केलचं नसेल तर नेमकी एव्हढी भिती आहे तरी कशाची, अशा टोलाही त्यांनी लगावला.सही पकडे है.... कुछ तो नही......यहाँ तो बहुत कुछ गडबड है
म्हणूनच माननीय हायकोर्टानं तपासात काही 'गडबड' वाटल्यास कारवाई करण्याचे आदेश #CBI ला दिले आहेत आणि आता दया चा न्यायव्यवस्थेवरही विश्वास नाही असं म्हणायचयं का ?? जर कुणी काही केलचं नसेल तर नेमकी एव्हढी भिती आहे तरी कशाची pic.twitter.com/K0DgOsUQoV — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 24, 2021
एकूणच अनिल देशमुख यांच्या प्रकरणावरून आता पुन्हा सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकलेले पाहायला मिळत आहे. मात्र दरवेळी फक्त प्रचारात या नेत्यांबरोबर दिसणारे सेलिब्रिटी आता आरोप प्रत्यारोप करतानाही या नेत्यांबरोबर असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं हा सामना चांगलाच रंगणार हेही नक्की.“गडबड” केली म्हणूनच #CBI आली आणि आता “बडबड” न करता न्यायालयाचा आदेश व्यवस्थित वाचावा जेणेकरून न्यायव्यवस्थेची तर्कसंगतेचा आपणास बोध होईल pic.twitter.com/ttq5zYQpYq
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 24, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, Chitra wagh