Home /News /mumbai /

BREAKING : 1 तारखेच्या लसीकरणावर प्रश्नचिन्ह, राजेश टोपेंनी व्यक्त केली चिंता

BREAKING : 1 तारखेच्या लसीकरणावर प्रश्नचिन्ह, राजेश टोपेंनी व्यक्त केली चिंता

लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. 7 हजार कोटींची लस लागणार आहे. सर्वांना लस मोफत द्याची की...

  मुंबई, 27 एप्रिल : कोरोनावर (Corona) मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. 1 मेपासून (1st may covid vaccine) 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. पण, लसीकरण पुरवठा हे मोठं आव्हान आहे. सीरम संस्था (serum institute of india) आणि भारत बायोटेकला (bharat biotech) पत्र दिले आहे पण त्यांनी अजून काही उत्तर दिलं नाही, अशी माहिती देत आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी 1 तारखेच्या लसीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि उपाययोजनेबद्दल माहिती दिली आहे. 'राज्यात लसीकरण 1 मेपासून करण्याचे नियोजन आहे. लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. 7 हजार कोटींची लस लागणार आहे. सर्वांना लस मोफत द्याची की दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत द्यावा याचा अहवाल कॅबिनेटला अहवाल दिला आहे, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल निर्णय जाहीर करतील, असं राजेश टोपे यांनी सांगितले. तसंच, राज्यात लशीचा साठा गरजेचा आहे. त्यासाठी सीरम संस्था आणि भारत बायोटेकला पत्र व्यवहार केला आहे. पण, त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर आले नाही, त्यामुळे 1 तारखेला लसीकरण कसे करावे, हा मोठा प्रश्न आहे, अशी चिंताही टोपेंनी बोलून दाखवली. विराट कोहली लेक वामिकाची अशी घेतोय काळजी, हा PHOTO बरंच काही सांगून जाईल '5 लाख 34 हजार लसीकरण केले आहे, साठा असेल तर महाराष्ट्रात एक दिवसांत 8 लाख लसीकरण करू शकतो. आज पर्यंत दीड कोटी लोकांचं लसीकरण केलं. त्यामुळे देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. 2 टक्यांपेक्षा कमी लस वाया गेली, इतर राज्यांपेक्षा कमी गेली आहे, अशी माहितीही टोपे यांनी दिली. 'जिल्ह्यात ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर किती मिळालं हे जाहीर करणार आहे. ऑक्सिजन साठा सोळाशे 15 टन वापर करत आहोत. ऑक्सिजन कसा वापर करावा यांची एसओपी आज सर्व जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी डॉक्टरना देणार आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नर्सरी स्थापन करणार तसंच ऑक्सिजनचा पर्यायी साठा ठेवणार आहे, यासाठी सर्व हॉस्पिटलचे ऑक्सिजन ऑडिट करणार आहे.  जर गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजन वापरलं तर कारवाई केली जाईल, असा इशाराही टोपे यांनी दिला.

  औकात विचारत नर्सनं डॉक्टरांच्या कानशिलात लगावली; घटनेचा VIDEO व्हायरल

  'जे एस डब्ल्यू यांनी 100 बेड ऑक्सिजन बेड कार्यवाही सुरू केली. ऑक्सिजनचे जागतिक टेंडर काढण्यात आले आहे. ऑक्सिजन काँट्रक्टकमध्ये 132 पीएसए प्लांट 27 ऑक्सिजन टॅंक, 25 हजार लिटर ऑक्सिजन आणि10 लाख रेमेडेसीवीर असणार आहे. चहे जागतिक टेंडर काढण्यात आले आहे 3 दिवसात खरेदी करणार आहे', अशी माहितीही टोपे यांनी दिली.
  Published by:sachin Salve
  First published:

  पुढील बातम्या