मुरादाबाद, 27 एप्रिल: सध्या देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने (Corona Pandemic in India) पसरत आहे. मागील काही दिवसांपासून देशात दररोज तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण (Corona Cases) आढळत आहेत. यामुळे रुग्णालय प्रशासनावर प्रचंड ताण येत आहे. अशातच नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये वाद झाल्याच्या किंवा मारहाण झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहे. हे कमी होतं म्हणून की काय आता वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी एकमेकांना मारहाण (Doctor and nurse hit each other) केल्याची घटना घडली आहे. यानंतर आता या घटनेचा व्हिडिओ (Viral video) समोर आला असून सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक नर्स आणि डॉक्टर यांची रुग्णालयातच खडाजंगी सुरू आहे. सुरुवातीला त्यांनी दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली आहे. त्यानंतर संतापलेल्या नर्सनं थेट डॉक्टरांच्या कानशिलात (nurse Slapped doctor) लगावली. यामुळे डॉक्टरानेदेखील नर्सवर हात उचलला आहे. त्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. तर पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्यांची समजूत काढून भांडणाला तूर्तास पूर्णविराम दिला आहे. पण दरम्यान भांडणाचा सर्व प्रसंग एका व्यक्तीनं आपल्या मोबाइलमध्ये कैद केला असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.
#WATCH | A doctor and a nurse entered into a brawl at Rampur District Hospital yesterday.
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 27, 2021
City Magistrate Ramji Mishra says, "I have spoken to both of them. They say they were under stress and overburdened. We will probe this & speak to both of them."
(Note: Abusive language) pic.twitter.com/XJyoHv4yOh
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्हा रुग्णालयातील आहे. संबंधित रुग्णालयात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी मृत्यूच्या दाखल्याची मागणी केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. खरंतर नातेवाईकांच्या मागणीनंतर मृत्यूचा दाखला आणण्यासाठी नर्स डॉक्टरांकडे गेली होती. मात्र डॉक्टरांनी तिला लेखी मागणी करण्यास सांगितली. दरम्यान नातेवाईकांना पुन्हा मृत्यूच्या दाखल्याची मागणी केली. परिणामी कामाच्या प्रचंड ताणामुळे डॉक्टर आणि नर्समध्येच वादाची ठिगणी पडली. हे ही वाचा- पुण्यात वृद्ध दाम्पत्याच्या बंगल्यात 16 लाखांची चोरी; चाकूच्या धाकाने लुटलं त्यानंतर नर्सनं तुझी औकात आहे का, असं विचारत डॉक्टरांच्या कानाखाली लगावली. यानंतर संतापलेल्या डॉक्टराने देखील नर्सवर हात उचलला. यावेळी घटनास्थळी असणाऱ्या इतरांनी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण हाणामारीच्या या घटनेमुळं रुग्णालयातील अपात्कालिन विभागात बराच गोंधळ निर्माण झाला होता. या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी कर्मचाऱ्यांची समजूत काढली आहे. याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.