• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • भयावह! मध्यरात्री मुंबईत रंगला सायको किलरचा थरार; 15 मिनिटात दगडाने ठेचून दोघांचा खेळ खल्लास

भयावह! मध्यरात्री मुंबईत रंगला सायको किलरचा थरार; 15 मिनिटात दगडाने ठेचून दोघांचा खेळ खल्लास

Murder in Mumbai: मुंबईतील भायखळा आणि जे जे मार्ग परिसरात शनिवारी मध्यरात्री दोघांची दगडाने ठेचून हत्या (crushed head with stone) करण्यात आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 29 ऑक्टोबर: मुंबईतील भायखळा आणि जे जे मार्ग परिसरात शनिवारी मध्यरात्री दोघांची दगडाने ठेचून हत्या (crushed head with stone) करण्यात आली आहे. अवघ्या 15 मिनिटाच्या अंतराने या दोन्ही हत्या (2 murders in 15 minutes) झाल्याने पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं होतं. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV footage) आधारे एका सायको किलरला अटक  (Psycho Killer arrested) केली आहे. कोणतही कारण नसताना आरोपीनं संबंधित निष्पाप व्यक्तींची हत्या केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. आरोपीनं अशाप्रकारे आणखी बऱ्याच जणांची हत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत. सुरेश शंकर गौडा असं अटक करण्यात आलेल्या 40 वर्षीय सायको किलरचं नाव आहे. आरोपी गौडा याने शनिवारी मध्यरात्री भायखळा आणि जे जे मार्ग परिसरात फुटपाथावर झोपलेल्या दोघांची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं कोणतंही कारण नसताना फुटपाथावर झोपलेल्या दोघांच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हत्या केली आहे. अवघ्या 15 मिनिटांत या दोन्ही हत्या घडल्याने मुंबई पोलीस खडबडून जागे झाले होते. हेही वाचा-विवाहितेच्या कौटुंबीक वादातून साधला डाव; ससूनमधील तोतया डॉक्टरकडून तरुणीवर रेप दोन्ही हत्या एकाच पद्धतीने केल्याने, दोघांना मारणारा व्यक्ती एकच असावा, असा संशय पोलिसांना होता. त्याआधारे पोलिसांनी तपास केला असता, पोलीस सायको किलरपर्यंत पोहोचले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला शोधून काढलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीची चौकशी केली असता, त्याने सहजच मनात आलं म्हणून हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. आरोपीच्या जबाबानंतर पोलीस प्रशासन देखील हादरून गेलं आहे. हेही वाचा-अपहरण करून जंगलात डांबून ठेवलं अन्...; मुलीसोबत महिनाभर सुरू होता भयंकर प्रकार विशेष म्हणजे 2015 साली देखील आरोपीनं कुर्ला परिसरात एकाची अशाच प्रकारे निर्घृण हत्या केली होती. त्यावेळी आरोपी गौडाला अटक देखील करण्यात आली होती. मात्र पुराव्याअभावी आरोपी गौडाची 2016 साली तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. यानंतर आरोपीनं पुन्हा त्याच पद्धतीने दोघांची हत्या केली आहे. यामुळे गेल्या काही वर्षात फुटपाथावर झालेल्या हत्या यानेच केल्या असाव्यात असा संशय पोलिसांना आहे. संबंधित सर्व हत्यांची प्रकरणं मुंबई पोलीस पुन्हा पडताळून पाहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: