• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • अपहरण करून जंगलात डांबून ठेवलं अन्...; अल्पवयीन मुलीसोबत महिनाभर सुरू होता भयंकर प्रकार

अपहरण करून जंगलात डांबून ठेवलं अन्...; अल्पवयीन मुलीसोबत महिनाभर सुरू होता भयंकर प्रकार

Crime in Bhandara: भंडाऱ्यातील एका 25 वर्षीय तरुणाने 13 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर तब्बल महिनाभर बलात्कार (Minor girl kidnapped and raped for a month) केला आहे.

 • Share this:
  भंडारा, 27 ऑक्टोबर: भंडारा जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 25 वर्षीय तरुणाने 13 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर तब्बल महिनाभर बलात्कार (Minor girl kidnapped and raped for a month) केला आहे. आरोपी तरुण आणि पीडित मुलगी  गोंदिया रेल्वे स्थानकावर संशयास्पद स्थितीत आढळल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी दोघांना पोलीस ठाण्यात घेऊन जात चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे संतापजनक प्रकरण उघडकीस येताच दिघोरी मोठी पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात अपहरण (Minor girl kidnapping) आणि पोक्सो कलमांसह (POCSO) अन्य गंभीर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक (Accused arrested) केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे लाखांदूर येथील 13 वर्षीय मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार चार दिवसांपूर्वी दिघोरी मोठी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा-चिमुकलीला पेरूच्या बागेत नेलं अन्..; 67 वर्षीय नराधमाच्या कृत्याने पुणे हादरलं! प्रशांत प्रभाकर लोणारे असं अटक केलेल्या 25 वर्षीय आरोपीचं नाव असून तो पवनी तालुक्यातील नवेगाव येथील रहिवासी आहे. आरोपी प्रशांत याने एक महिन्यापूर्वी लाखांदूर येथील रहिवासी असणाऱ्या 13 वर्षीय मुलीचं अपहरण केलं होतं. आरोपीनं पीडित मुलीला जंगल परिसरात घेऊन जात तिच्यावर महिनाभरापासून लैंगिक अत्याचार केले होते. दरम्यान पीडित अल्पवयीन मुलगी आरोपी तरुणासोबत गोंदिया रेल्वे स्थानकावर आढळून आल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. हेही वाचा-15 वर्षीय मुलाचं 5 वर्षीय मुलीसोबत विकृत कृत्य; CCTV फुटेज पाहून वडिलही हादरले! आरोपीने महिनाभरापासून जंगल परिसरात आपल्यावर अनेकदा अत्याचार केल्याचं पीडित मुलीनं पोलिसांना सांगितलं आहे. पीडित मुलीच्या वडीलांनी दिलेली तक्रार आणि वैद्यकीय रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात अपहरण आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपी प्रशांतला दिघोरी मोठी पोलिसांनी अटक केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: