मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Pune: विवाहितेच्या कौटुंबीक वादातून साधला डाव; ससूनमधील तोतया डॉक्टरकडून तरुणीवर बलात्कार

Pune: विवाहितेच्या कौटुंबीक वादातून साधला डाव; ससूनमधील तोतया डॉक्टरकडून तरुणीवर बलात्कार

Rape in Pune: पुण्यातील ससून रुग्णालयात डॉक्टर असल्याची खोटी माहिती (imposter doctor in sassoon hospital) देऊन एका तरुणाने पिंपरीतील तरुणीवर अत्याचार (imposter doctor raped married woman) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 29 ऑक्टोबर: पुण्यातील ससून रुग्णालयात डॉक्टर असल्याची खोटी माहिती (imposter doctor in sassoon hospital) देऊन एका तरुणाने पिंपरीतील तरुणीवर अत्याचार (imposter doctor raped married woman) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फिर्यादी तरुणीच्या घरी सुरू असलेल्या कौटुंबीक वादाचा गैरफायदा घेत आरोपीनं पीडितेवर अनेकदा अत्याचार केला आहे. तसेच पीडितेचे अश्लील व्हिडीओ (Obscene videos) सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी (Threat to viral) देत तिला ब्लॅकमेलही (Blackmail) केलं आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तोतया डॉक्टरला बेड्या ठोकल्या (imposter doctor arrested) आहेत. या घटनेचा पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

नायका रुद्रा रमेशराव ऊर्फ किशन रमेशराव जाधव असं गुन्हा दाखल झालेल्या 33 वर्षीय तरुणाचं नाव असून तो विमाननगर परिसरातील रहिवासी आहे. याप्रकरणी पिंपरी येथील रहिवासी असणाऱ्या 29 वर्षीय महिलेनं विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. नराधम आरोपी गेल्या सात महिन्यांपासून पीडित तरुणीला ब्लॅकमेल करत तिचं लैंगिक शोषण करत होता. अखेर पीडितेनं हिंमत एकवटून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा-Nashik: पत्नीचा छळ करून लुबाडला 1 कोटींचा ऐवज; करुण कहाणी ऐकून पोलीसही हादरले!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशन याने आपण डॉक्टर असून ससून रुग्णालयात नोकरीस असल्याची खोटी माहिती दिली होती. तसेच स्वत:चे नर्सिंग आणि फार्मसी कॉलेज असल्याच्या थापा देखील मारल्या होत्या. त्यासाठी आरोपीनं खोटं आयकार्ड आणि वैद्यकीय पदवीची कागदपत्रे दाखवून पीडितेचा विश्वास संपादन केला होता. फिर्यादीच्या घरी सुरू असलेल्या कौटुंबीक वादाचा गैरफायदा घेत आरोपीनं जवळीक साधून तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित करत अश्लील व्हिडीओ शूट केले होते. संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेवर अनेकदा बलात्कार केला होता.

हेही वाचा-नाशिक हादरलं! वणी येथील बस स्थानक परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार

याशिवाय, आरोपीनं फिर्यादी तरुणीच्या नातेवाईकांना नोकरी लावण्याच्या बहाण्याने तिच्याकडून तब्बल 16 लाख 65 हजार रुपयांची रक्कम घेतली होती. पण नातेवाईकांना नोकरी न लावता त्यांची आर्थिक फसवणूक केली होती. बदनामीच्या भीतीने फिर्यादी तरुणी आरोपीचा सर्व छळ निमूटपणे सहन करत होती. अखेर तिने हिंमत एकवटून पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तोतया डॉक्टरला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.

First published:

Tags: Crime news, Pune, Rape