• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Good News! Google च्या माध्यमातून घरबसल्या कमवा 50000, वाचा काय आहे प्रोसेस

Good News! Google च्या माध्यमातून घरबसल्या कमवा 50000, वाचा काय आहे प्रोसेस

तुम्ही पण स्मार्टफोन वापरत असाल तर त्या माध्यमातून कमाई करणं शक्य आहे. स्मार्टफोन आणि त्यातील Google तुम्ही चा योग्य वापर केल्यास तुम्ही दर महिन्याला 50 हजार रुपयांपर्यंत कमाई करु शकता.

  • Share this:
नवी दिल्ली, 28 जुलै: आताच्या डिजिटल (Digital) युगात अनेकांकडे स्मार्टफोन आहे. आता अनेक कामं ही स्मार्टफोनच्या (Smartphone) माध्यमातून होत आहेत. तुम्ही पण स्मार्टफोन वापरत असाल तर त्या माध्यमातून कमाई करणं शक्य आहे. स्मार्टफोनचा योग्य वापर केल्यास तुम्ही दर महिन्याला 50 हजार रुपयांपर्यंत कमाई करु शकता. स्मार्टफोन आणि गुगल (Google) हे अत्यंत महत्वाचं समीकरण आहे. त्यामुळे यासाठी तुम्हाला गुगलची मदत घ्यावी लागेल. अतिरिक्त कमाईसाठी गुगलकडून रिवॉर्ड (Reward) दिले जातात. या रिवॉर्डसच्या माध्यमातून तुम्ही कमाई (Earning) करु शकता. गुगल ओपिनियन रिवॉर्डसमध्ये (Google Opinion Rewards) काही सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन एखादा चित्रपट रेंटवर (Rent) घेणं किंवा आवडती एखादी गेम इन-अॅप खरेदी करणं सोपं आहे. यामाध्यमातून तुम्ही कोणत्याही मुद्दयावर आपले मत व्यक्त करु शकता आणि त्याबदल्यात पैसे कमवू शकता. ही कमाई कशी करता येते जाणून घेऊया... हे वाचा-5 वर्षात 3 लाखांचे झाले 11 लाख, तुम्ही देखील 100 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक गुगलच्या या सर्व्हेत व्हावं लागेल सहभागी गुगल ओपिनियन रिवॉर्डसमध्ये तुम्ही अगदी सहजपणे पैसे कमवू शकता. गुगल विविध मुद्द्यांवर सर्व्हे (Survey) करत असते. या सर्व्हेत सहभागी होऊन तुम्हाला कमाई करता येऊ शकते. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला स्मार्टफोनवर गुगलचे हे गुगल ओपिनियन रिवॉर्ड्स फिचर (Feature) डाऊनलोड करावं लागेल. सर्व्हेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला दिवसाला 50 ते 500 रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकेल. तथापि कमाईचे हे साधन हे सर्व्हेक्षणावर अवलंबून आहे. सर्व्हेतून मिळालेले पैसे तुम्ही गुगल रिवॉर्ड पॉईंटमध्ये कन्व्हर्ट करु शकता किंवा या पैश्यातून ऑनलाइन म्युझिक आणि अन्य गोष्टी खरेदी करु शकता. हे वाचा-ऑनलाइन बँकिंगमध्ये असुरक्षिततेचा धोका? SBIने Yono Lite App जोडलं महत्त्वाचं फीचर या पध्दतीने करु शकता 50 हजार रुपयांची कमाई या पध्दतीने तुम्ही आयपोलच्या (IPoll) माध्यमातूनही कमाई करु शकता. हे एक इंक कॉर्पोरेशन स्मार्टफोन फीचर आहे. या फीचरमुळे तुम्हाला अधिक पैसे मिळवता येतील. गुगल ओपिनियनच्या तुलनेत यात तुम्हाला अधिक रक्कम मिळू शकते. गुगल ओपिनियन रिवॉर्डस आणि आयपोल हे दोन्ही फीचर्स जवळपास सारखेच आहेत. यात तुम्हाला एक सर्व्हे पुर्ण केल्यानंतर 100 ते 1000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते. समजा तुम्ही एका महिन्यात 50 सर्व्हे पूर्ण केले तर तुम्ही 5 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत पैसे कमवू शकता. मात्र यासाठी काही अटी आहेत. यातून तुम्हाला मिळणारे तुमचे पैसे पेपल अकाउंट किंवा अमेझॉन आय ट्युन्स अकाउंटच्या माध्यमातून जमा होतात.
First published: