मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai Drug Case: 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट

Mumbai Drug Case: 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट

नवाब मलिक यांनी सलग तीन दिवस पत्रकार परिषद घेऊन मोठंमोठे खुलासे केले. हे सर्व खुलासे मलिकांनी पुराव्यासह दाखवले आहेत.

नवाब मलिक यांनी सलग तीन दिवस पत्रकार परिषद घेऊन मोठंमोठे खुलासे केले. हे सर्व खुलासे मलिकांनी पुराव्यासह दाखवले आहेत.

नवाब मलिक यांनी सलग तीन दिवस पत्रकार परिषद घेऊन मोठंमोठे खुलासे केले. हे सर्व खुलासे मलिकांनी पुराव्यासह दाखवले आहेत.

    मुंबई, 09 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या Cordelia क्रूझवर एनसीबीने धाड टाकून ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. या कारवाईवर नवाब मलिकांनी गंभीर आरोप केलेत. नवाब मलिक यांनी सलग तीन दिवस पत्रकार परिषद घेऊन मोठंमोठे खुलासे केले. हे सर्व खुलासे मलिकांनी पुराव्यासह दाखवले आहेत. मलिकांनी दिलेले सर्व पुरावे व्हिडिओ माध्यमातले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं प्रसिद्ध वाक्य लाव रे तो व्हिडिओ.. याचाच काहीसा आधार घेत मलिकांनीही पत्रकार परिषदेत एनसीबीनं केलेल्या कारवाईनंतर समोर आलेल्या फुटेजचे व्हिडिओ दाखवलेत. त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी काही गंभीर आरोप करत एनसीबीला प्रश्न उपस्थित केलेत. पहिल्या पत्रकार परिषदेतील व्हिडिओ आर्यन खानची अटक ही बनावट आहे. गेल्या एक महिन्यापासून याबद्दल पत्रकारांना माहिती प्रसारित केली जात होती की पुढील लक्ष्य अभिनेता शाहरुख खान आहे, असं नवाब मलिक म्हणाले. 'कारवाईच्या संदर्भातील जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊन जात आहे आणि याच व्यक्तीसोबत आर्यन खानचा एक सेल्फी फोटो आहे. त्यानंतर एनआयएनं दिल्लीतल्या एका अधिकाऱ्याच्या माहितीच्या आधारावर माहिती दिली की, NCB नं सांगितलं की हा व्यक्ती आमचा अधिकारी नाही. अरबाज मर्चंटचा देखील एक व्हिडीओ एनआयएनं रिलीज केला. यात लाल शर्ट घातलेली व्यक्ती दिसत आहे. हे दोन्ही फीड एनआयएनं रिलीज केलेत. या व्हिडीओत पहिला व्यक्ती के. पी. गोसावी आणि दुसरा व्यक्ती मनीष भानुशाली आहे, असंही मलिक यांनी सांगितलं. हेही वाचा- Mumbai Drug Case: BJP नेत्याचा तो मेहुणा कोण? , नवाब मलिकांनी केला मोठा खुलासा तसेच हा व्यक्ती भाजपचा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, जे. पी. नड्डा आणि आशिष शेलार यांच्यासोबत फोटो आहेत. त्यामुळे मलिकांनी काही सवाल उपस्थित केलेत. एनसीबी आणि भाजपचे काय संबंध आहेत हे एनसीबीनं सिद्ध करावं, असं आव्हानच मलिकांनी दिलं. आजच्या पत्रकार परिषदेतील व्हिडिओ एनसीबीनं 8 लोकांना ताब्यात घेतलं असं सांगितलं होतं. पण एनसीबीनं 11 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तिघांना सोडण्यात आलं. त्यात रिषभ सचदेवा, प्रतिक गाबा, अमीर फर्निचरवाला या तिघांना सोडून देण्यात आलं. रिषभ सचदेवा यांचा भाजप नेत्यांशी संबंध असल्याचा खुलासा नवाब मलिक यांनी केला आहे. रिषभ सचदेवा, हे भाजप युवा मोर्चाचे मोहित भारती यांचा मेहुणा आहे. यावेळी मलिकांनी या तिघांना एनसीबीच्या कार्यालयात जातानाचे आणि त्यांची सुटका केलेल्यांचे व्हिडिओ समोर आणले. या तिघांना सोडून देण्यात आले एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ज्या तिघांना सोडून देण्यात आले त्यामध्ये रिषभ सचदेवा, प्रतीत गाबा, आमिर फर्निचरवाला यांचा समावेश होता असं नावाब मलिक यांनी म्हटलं. क्रूझवर एनसीबीने 11 जणांना ताब्यात घेतले होते, ताब्यात घेतल्यावर चौकशीसाठी सर्वांना एनसीबी कार्यालयात आणलं आणि त्यानंतर तिघांना दोन तासांत सोडून देण्यात आले. तिघांना सोडून देण्याचा आदेश कुणी दिला? या तिघांचे फोन जप्त का नाही केले? असे सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केले आहेत. जबाबदार व्यक्ती असं कसं बोलू शकतो - नवाब मलिक ज्या दिवशी छापमारी केली त्या दिवशी समीर वानखेडे ने 8 ते 10 लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली. एक जबाबदार अधिकारी असं कसं म्हणू शकतो? असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. हेही वाचा- IPL 2021: 5 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचं यंदा काय चुकलं? रोहितनं दिलं उत्तर  एनसीबीने खुलासा करावा रिषभ सचदेवा, हे भाजप युवा मोर्चाचे मोहित भारती यांचा मेहुणा आहे. रिषभ सचदेवा हे राष्ट्रपतींना पण भेटले आहेत, आणि राष्ट्रपती यांनी पुरस्कृत केलं आहे. रिषभ सचदेवा यांना 2 तासात सोडण्यात आलं. जेव्हा सुनावणी सुरू होती तेव्हा यांचं नाव समोर आलं होतं. यांच्याच बोलण्यावरून आर्यन आला होता, असा खुलासाही मलिकांनी केला आहे. या 3 लोकांना सोडण्याचे आदेश कुणी दिले हे एनसीबीला सांगावं लागेल, असा सवाल मलिकांनी एनसीबीला विचारलं आहे. आम्ही मागणी करयोय की वानखेडे यांनी याचा तात्काळ खुलासा करावा, असं मलिक म्हणाले. समीर वानखेडे यांचे फोन डिटेल्स काढावे रिषभ सचदेवा यांच्या बाबांच्या फोनवर महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील भाजप नेत्यांचा फोनवर वानखेडे यांचं बोलणं झालं, असा आमचा आरोप असल्याचं मलिकांनी म्हटलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Nawab malik, NCP

    पुढील बातम्या