मुंबई, 30 जानेवारी : वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाची नुकतीच युती झाली आहे. मात्र, ते महाविकास आघाडीचा भाग आहेत की नाही? यासंदर्भात कोणतीही स्पष्टता नव्हती. आता मात्र वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यावर भाष्य केलं आहे. "आजच्या क्षणाला वंचित बहुजन आघाडी महविकास आघाडीचा भाग नाही, आम्ही शिवसेनेशी युती केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून निरोप येईल, तेव्हा आम्ही ठरवू" , असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. यावेळी पुन्हा एकदा शरद पवार आणि काँग्रेसवर त्यांनी टीका केली.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
आजच्या क्षणाला वंचितने ठाकरे गटाच्या शिवसेने पक्षाशी युती केली आहे. आम्ही महविकास आघाडीचा भाग नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून निरोप येईल तेव्हा ठरवू. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी बोलायचे ठरवले आहेत, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. आमच्यावर अजून टीका करावी, त्यातून आमची प्रसिद्धी होत आहे. आम्ही दोघांनी युती जाहीर करताना काँग्रेसच्या सेक्युलरची भाषा आमची भाषा नाही. बाबासाहेब यांची व्याख्या आणि काँग्रेसची व्याख्या वेगळी असल्याचेही ते म्हणाले. अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर देशाचे नेतृत्व करणारी व्यक्ती तयार झाली नसल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. ते दोघे आले तर 200 च्या वरती, नाही आले तर 150. आता त्यांनी ते ठरवले पाहिजे की यायचे की नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शरद पवार यांनी भूमिका घेतली की ते मान्य करतील असे नाही, असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.
वाचा - शिवसेनेसाठी अंतिम लढाई? निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाचा मोठा दावा, अखरेच्या क्षणी शिंदेचंही उत्तर
आणखी काही पक्षांसोबत युतीची शक्यता?
संभाजीराजे माझ्याकडे येऊन गेले. आपल्याला नवीन काही करायचे असेल तर जूनं पाणी बदलून नवी पाणी देऊन महाराष्ट्राला गतिमान करता येईल. विकासाच्या संदर्भात पण तेच आहे. आज शहरीकरण वाढत आहेत, त्याच्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. प्रत्येक शहर मुंबई नाही की 4 बाजूने पाणी आहे. उरलेली शहर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शहर आणि ग्रामीण यांच्यामध्ये पाण्यावरून वाद आता नव्याने दिसतो आहे. संभाजीराजेंना मी सांगितले की हा वाद थांबवावा लागेल. नवीन धोरण आखावे लागेल आणि हे नव्याने मांडावे लागेल तर नव्याने भिडू लागतील. जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, हा कृषी प्रधान देश आहे. या देशाला आर्थिक स्थैर्य हवं असेल तर उद्योगांची गरज आहे. त्यामुळे पहिले 5 वर्ष जड उद्योग निर्माण करायला लागले. जुन्या मंडळींना घेऊन डाव खेळायला गेलो तर पुन्हा उपासमारी आणि पुन्हा देशात आंदोलन, धर्म आणि त्यातला भेद सुरू होईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मोदीनंतर दुसरा पंतप्रधान कोण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल आहे, तुमच्यानंतर दुसरा पंतप्रधान कोण? एकही माणूस आपल्या नजरेसमोर नाही, की जो या देशाचे नेतृत्व करू शकतो. काँग्रेस, राष्ट्रवादी, दक्षिण, उत्तरेतील राज्यातही तिच परिस्थिती आहे. एक ही व्यक्ती राहिली नाही की तो त्याच्या राज्याच्या बाहेर जाऊन नेतृत्व करू शकतो. ईडी, सीबीआय, आयबीचा धाक आहे म्हणून सगळे लोकं मुजरा करतात, हाथ जोडतात. भाजपवाले म्हणतात की आम्ही 2024 मध्ये परत येऊ, मी म्हणतो 29 मध्ये याल कारण आम्हा सगळ्यांना आत टाकतील. मग विरोध कोण करणार? तुम्ही त्यांना दोनदा पंतप्रधान केलं. मोदी यांच्या मनामध्ये भीती आहे की 2004 मधील चारित्र्य समोर येऊ नये म्हणून बीबीसीचा माहितीपट दाखवणाऱ्यांना अटक केली जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.