मुंबई, 16 फेब्रुवारी : पूजा चव्हाण आत्महत्या (pooja chavan) प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केल्याचे वृत्त समोर आले आहे. भाजपचे विधान परिषदेचे विरोक्षीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी याबद्दल दावा केला आहे. प्रवीण दरेकर यांनी ट्वीट करून संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा दावा केला आहे. ‘संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवर पाठवलेला राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द करावा.कारण एकाने ‘मारल्यासारख करायचं, दुसऱ्याने रडल्यासारख करायचं’ असं होता कामा नये. तसेच राजीनामा दिल्यानंतर निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी’ अशी मागणीही दरेकर यांनी केली.
संजय राठोड हे मुंबईत पोहोचले आहे. त्यांनी राजीनामा दिला आहे की नाही, याबद्दल अद्याप शिवसेनेकडून कोणताही माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. पण, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे संजय राठोड अडचणीत सापडले आहे. भाजपच्या कार्यकर्त्याने ऑडिओ क्लिप केल्या व्हायरल गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात तब्बल 12 ऑडिओ क्लीप समोर आल्या आहेत. या क्लीपवरुन विरोधकांनी ठाकरे सरकारवर आगपाखड करण्यास सुरू केली आहे. या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड यांचा संबंध असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. या प्रकरणात ऑडिओ क्लीप हे महत्त्वपूर्ण पुरावे मानले जात आहे. दरम्यान या ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून व्हायरल झाल्या आहेत. त्यातून या क्लीप नेमक्या कशा बाहेर आल्या याबाबत विचारणा केली जात आहे. त्याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळीच भाजपच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने अरूण राठोडकडून या ऑडिओ क्लीप काढून घेतल्याचं समोर येत आहे. तसेच त्याचवेळी त्यांच्या फोटो आयडीचे फोटो काढून घेतल्याचं सांगितलं जात आहे. पण या प्रकरणी आता दबाव एवढा वाढू लागला आहे. याशिवाय ज्या कार्यकर्त्याने या क्लीप अरूण राठोडकडून घेतल्या तोदेखील आता माध्यमांसमोर येण्याचं टाळत आहे.