Home /News /mumbai /

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात पंतप्रधानांची एन्ट्री; अमित शाह आणि जे पी नड्डांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात पंतप्रधानांची एन्ट्री; अमित शाह आणि जे पी नड्डांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

या सत्तासंघर्षादरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील या राजकीय स्थितीमध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एन्ट्री झाली आहे. पंतप्रधानांनी याबाबत महाराष्ट्र भाजप नेत्यांना काही सूचना केल्या आहेत

    नवी दिल्ली 28 जून : महाराष्ट्रातील राजकीय स्थिती सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. राज्यात सध्या राजकीय भूकंप आलेला आहे. एकीकडे भाजपचे नेते लवकरच राज्यात भाजपचं सरकार स्थापन होणार असल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. एकनाथ शिंदे यांची या सर्वात अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde Faction) यांच्यासोबत जवळपास ५० बंडखोर आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना, राज्याच्या राजकारणाला मिळणार नवे वळण एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदारांना समजवण्याचा आणि परत आणण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सातत्याने सुरू आहे. अशात आता या सत्तासंघर्षादरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील या राजकीय स्थितीमध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एन्ट्री झाली आहे. पंतप्रधानांनी याबाबत महाराष्ट्र भाजप नेत्यांना काही सूचना केल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या महाराष्ट्र भाजप नेत्यांना सूचना केल्या आहेत. महाराष्ट्र सरकार स्थापन करण्यासंदर्भात अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्याशी चर्चा करावी, अशा सूचना पंतप्रधानांनी केल्या आहेत. अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही जबाबदारी टाकली आहे. BREAKING : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला होता फडणवीसांना फोन, शिंदेंच्या बंडाच्या दिवशीची मोठी बातमी दरम्यान एकनाथ शिंदे हे गेल्या ७ दिवसांपासून गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. आज सातव्यादिवशी भाजपच्या गोटामध्ये कालपासून घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीत भाजप वरिष्ठ नेत्यांसोबत तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहे. खाजगी विमानाने मुंबईहुन दिल्लीला निघाले आहे. महाराष्ट्रातील सत्ता नाट्यावर नवी दिल्लीत महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. आज सायंकाळपर्यंत मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहे.विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाचे वकिल महेश जेठमलानी हे फडणवीस यांच्यासोबत आहे. महेश जेठमलानी हे राम जेठमलानी यांचे पुत्र आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, PM narendra modi

    पुढील बातम्या