जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / PM Modi in Mumbai : फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात, शिंदेंचं कौतुक, मोदींनीही वाजवल्या टाळ्या, Video

PM Modi in Mumbai : फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात, शिंदेंचं कौतुक, मोदींनीही वाजवल्या टाळ्या, Video

PM Modi in Mumbai : फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात, शिंदेंचं कौतुक, मोदींनीही वाजवल्या टाळ्या, Video

PM Modi In Mumbai पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात मेट्रो तसंच वेगवेगळ्या योजनांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. या लोकार्पणाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईच्या बीकेसी मैदानात जाहीर सभा घेतली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात मेट्रो तसंच वेगवेगळ्या योजनांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. या लोकार्पणाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईच्या बीकेसी मैदानात जाहीर सभा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं, या भाषणात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टाळ्या वाजवल्या. काय म्हणाले फडणवीस? ‘मोदीजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज्यात डबल इंजिन सरकार आलं. तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून जनतेनं डबल इंजिन सरकार दिलं होतं, पण काहींनी बेईमानी केली, त्यामुळे जनतेच्या मनातलं सरकार बनलं नाही. पण बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे अनुयायी एकनाथ शिंदे यांनी हिंमत केली. तुमच्या आशिर्वादाने महाराष्ट्राच्या जनतेचं सरकार बनलं’, असं फडणवीस म्हणाले.

‘टक्केवारीमुळे कामं रखडली होती. 25 वर्षात मुंबईला काहीच दिलं नाही या मेट्रोचं भूमिपूजन आणि उद्घाटनही तुम्हीच केलं, हे नवीन कल्चर आलं आहे. धारावीचाही पुनर्विकास होणार आहे, हे तुमच्यामुळे शक्य झालं आहे. याचं भूमिपूजन आणि लोकार्पणही तुमच्याहस्ते होईल. तुमचे आशिर्वाद गरजेचे आहेत’, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात