• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • VIDEO: महिलेला वाचण्यासाठी फोटोग्राफरनं घेतली समुद्रात उडी; गेट वे ऑफ इंडियाजवळचा प्रकार

VIDEO: महिलेला वाचण्यासाठी फोटोग्राफरनं घेतली समुद्रात उडी; गेट वे ऑफ इंडियाजवळचा प्रकार

मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ एक महिला समुद्रात पडली. यानंतर प्रसंगावधान राखत एका फोटोग्राफरनं तात्काळ समुद्रात उडी घेतली

 • Share this:
  मुंबई 13 जुलै : मुंबईतून एक धक्कादायक व्हिडिओ (Video) समोर आला आहे. या घटनेत एक महिला समुद्रात पडली. हा प्रकार मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ (Gateway of India) घडला. यानंतर प्रसंगावधान राखत एका फोटोग्राफरनं तात्काळ समुद्रात उडी घेतली. या व्यक्तीनं तत्परता दाखवत महिलेचा जीव वाचवला (Photographer Rescued a Woman Who Fell into the Sea) आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. VIDEO : दोन्ही दिशेला गाड्या आणि मध्ये महाकाय 20 फुटांचा अजगर; गावकरी भयभीत गेट वे ऑफ इंडिया येथील सुरक्षा भितींवर बसलेली असताना या महिलेचा तोल गेला. यानंतर महिला समुद्रात पडली. यानंतर याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरनं लगेचच समुद्रात उडी घेत या महिलेचा जीव वाचवला. ही घटना सोमवारी घडली असून घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. फोटोग्राफरच्या या धाडसाचं आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यानं केलेल्या या मदतीचं सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे. VIDEO - भरमांडवात फुटला वराच्या अश्रूचा बांध; नवरीऐवजी स्वत:च ढसाढसा रडू लागला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की या व्यक्तीनं महिलेलेला वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेतली आहे. आसपास असणाऱ्या पर्यटकांनी त्यांना वरती खेचण्यासाठी पाण्यात दोर टाकला. याच्याच मदतीनं महिलेला वर काढण्यात आलं. महिला 20 फूट खोल पाण्यात कोसळल्यानं बचावकार्यासाठी बराच वेळ लागला. मात्र, घटनेत तिचा जीव वाचला.
  Published by:Kiran Pharate
  First published: