व्हिडीओत पाहू शकता नवरदेवाचा चेहरा भावुक झाला आहे. त्याचे डोळे पाण्याने भरले आहेत. हळूहळू त्याच्या डोळ्यांत भरलेल्या पाण्याचा बांध फुटतो आणि त्याच्या डोळ्यातील अश्रू बाहेर त्याच्या चेहऱ्यावर येतात. हे वाचा - लग्न लागता लागता निघाला नवरीचा मेकअप; पाहताच नवऱ्याने मग काय केलं पाहा VIDEO नवरदेवाला रडू कोसळतं ते नवरीला पाहिल्यानंतर. समोरून नटून थटून आपल्या नवरीला येताना पाहताच नवरदेव भावुक होतो आणि तो स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवू शकत नाही. मांडवातच त्याला रडू कोसळतं. त्यानंतर नवरी स्टेजवर येते आणि आपल्या हातांनी नवरदेवाचे अश्रू पुसते. त्यानंतर तर नवरदेवाला आपलं रडू बिलकुल आवरता येत नाही. तो नवरीला मिठी मारतो आणि ढसाढसा रडू लागतो. त्याला रडताना पाहून नवरीही इमोशन होते. तिच्या डोळ्यातही अश्रू दिसून येतात. एकंदर व्हिडीओ पाहिल्यानंतर दिसून येतं नवरदेवाचे हे अश्रू म्हणजे त्याचं नवरीवर असलेलं प्रेम आहे. आपली प्रिय व्यक्ती आता कायमची आपली होणार आहे, याचा आनंद प्रत्येकाला होतो. काही जणांचा हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यातून दिसून येतो. तर काही जणांचा आनंद या नवऱ्यासारखा आनंदाश्रूच्या रूपाने दिसून येतो. हे वाचा - एकटी नारी तरुणांवर पडली भारी! छेड काढताच घडवली अशी अद्दल; कुणीच करणार नाही नाद ट्रेंडिग दुल्हनिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा रोमँटिक आणि इमोशनल व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Relationship, Viral, Viral videos, Wedding couple, Wedding video