मुंबई 7 जून: मुंबईचा सर्वात महत्त्वाचा भाग असलेल्या मरीन ड्राईव्हवर फिरायला येणारे लोक कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत आहेत. सरकार आणि प्रशासन वारंवार सोशल डिस्टन्सिंग ठेवा असं सांगत असताना काही जण तिथेच चहा-स्नॅक्स पार्टी करताना आढळून आले आहेत. मंत्रालय, विधान भवन आणि पोलीस मुख्यालय या भागापासून अगदी जवळ आहेत. असं असतानाही नागरीक इथे गर्दी करत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
अनलॉक 1 करताना सरकारने सकाळी आणि संध्याकाळी दोन दोन तासांची सूट दिली होती. त्यामुळे त्या वेळेमध्ये इथे गर्दी झालेली बघायला मिळत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर कोरोना व्हायरसचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राज्यात आज 3007 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 85975 अशी झाली आहे. आज नवीन 1924 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 39314 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 43591 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातली रुग्णसंख्या 85 हजारांच्या वर गेल्याने महाराष्ट्राने चीनलाही मागे टाकले आहे. तर देश कोरोना रुग्णांच्या संख्येत जगात 5 व्या क्रमांकावर असून स्पेनलाही भारताने मागे टाकले आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये संख्या अशीच राहिल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
हे वाचा - जगभरात कोरोनाने घेतला लाखोंचा बळी; या 3 देशांमध्ये माजलाय हाहा:कार
सध्या राज्यात 43591 रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात ४७ शासकीय आणि ३८ खाजगी अशा एकूण ८५ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ३७ हजार १२४ नमुन्यांपैकी ८२ हजार ९६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ४६ हजार ५६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७४१ खाटा उपलब्ध असून सध्या २९ हजार ०९८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
हेही वाचा -
लॉकडाऊनमध्ये दररोज केवळ डाळ-भात देत होता रेस्टॉरंटचा मॅनेजर, वेटरनं केली हत्या
प्रेग्नन्सीत महिलेला झाला कोरोना; अँटिबॉडीजसह जन्माला आलं बाळ
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus