मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

प्रेग्नन्सीत महिलेला झाला कोरोना; अँटिबॉडीजसह जन्माला आलं बाळ

प्रेग्नन्सीत महिलेला झाला कोरोना; अँटिबॉडीजसह जन्माला आलं बाळ

डॉक्टरांच्या मते बाळाला त्याचा आईकडून या अँटिबॉडीज (antibody) मिळाल्या आहेत.

डॉक्टरांच्या मते बाळाला त्याचा आईकडून या अँटिबॉडीज (antibody) मिळाल्या आहेत.

डॉक्टरांच्या मते बाळाला त्याचा आईकडून या अँटिबॉडीज (antibody) मिळाल्या आहेत.

  • Published by:  Priya Lad

बीजिंग, 07 जून : कोरोनाव्हायरसची (coronavirus) लागण झालेल्या महिलेच्या गर्भातील बाळालाही (baby) कोरोनाव्हायरसची लागण होऊ शकते, याचे पुरावे अद्याप सापडले नाहीत. असं होण्याची शक्यता आहे का? याबाबत अद्याप अभ्यास सुरू आहे. आतापर्यंत तरी कोरोनाग्रस्त महिलेमुळे बाळाला कोरोनाची लागण झाल्याचं प्रकरण नाही. कोरोनाग्रस्त महिलांनी निरोगी बाळाला जन्म दिलेला आहे. चीनमध्येही (China) कोरोनामुक्त झालेल्या महिलेने अशाच निरोगी बाळाला जन्म दिला मात्र त्या बाळाच्या शरीरात कोरोनाव्हायरसविरोधातील अँटिबॉडीज सापडल्यात.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, चीनच्या शेनझेनमध्ये (Shenzhen) एका बाळाने कोविड-19 (COVID-19) विरोधातील अँटिबॉडीजसह जन्म घेतला आहे. डॉक्टरांच्या मते बाळातील या अँटिबॉडीजमध्ये त्याच्या आईकडून मिळाल्या आहेत. याबाबत डॉक्टर अधिक अभ्यास करत आहेत.

हे वाचा - कामात खाणं-पिणं, आराम विसरलात; तुम्ही 'या' समस्येचे शिकार तर नाही झालात ना?

मिळालेल्या माहितीनुसार,  एप्रिलमध्ये या महिलेला कोरोनाव्हायरसचं निदान झालं होतं, ज्यावेळी ती प्रेग्ननंट होती. मात्र तिच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. उपचारानंतर दहा दिवसांतच ही महिला कोरोना नेगेटिव्ह झाली. त्यानंतर कोणतीच समस्या या महिलेला जाणवली नाही. 30 मे रोजी शेनझेन थर्ड रुग्णालयात (Shenzhen Third Hospital) या महिलेची प्रसूती झाली.बाळ पूर्णपणे निरोगी आहे, मात्र त्याच्या शरीरात कोरोनाव्हायरसशी लढणाऱ्या अँटिबॉडीज सापडल्यात. डॉक्टरांच्या मते, हे पहिलंच प्रकरण आहे ज्यामध्ये गर्भातच बाळामध्ये अँटिबॉडीज तयार झाल्यात. आई आणि बाळ दोघंही निरोदी असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हे वाचा - कोरोनाशी लढण्यासाठी मदत करणार मिठाई; तुम्ही खाल्लीत की नाही?

गरोदरपणात कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या महिलेच्या गर्भातील बाळाला कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं प्रकरण आतापर्यंत नाही मात्र बाळाच्या जन्मानंतर कोरोनाग्रस्त आईने विशेष काळजी घ्यायला हवी. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, बाळाला आईच्या दुधातून कोरोनाव्हायरसची लागण झालं असंही अजून कुठे दिसून आलं नाही. त्यामुळे कोरोनाग्रस्त आई आपल्या बाळाला दूध पाजू शकते. मात्र मास्क लावणं. बाळाला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुणं अशी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असा सल्लाही डब्ल्यूएचओने दिला आहे.

हे वाचा - कोरोनाग्रस्त आईने Breasfeeding केल्याने बाळाला व्हायरसचा धोका असतो का?

First published:

Tags: Coronavirus, Pregnant woman