लॉकडाऊनमध्ये दररोज केवळ डाळ-भात देत होता रेस्टॉरंटचा मॅनेजर, वेटरनं केली हत्या

लॉकडाऊनमध्ये दररोज केवळ डाळ-भात देत होता रेस्टॉरंटचा मॅनेजर, वेटरनं केली हत्या

जेवणावरून वाद झाल्यामुळे दोघांची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

  • Share this:

ठाणे, 7 जून: ठाण्यातील मीरा रोड येथील एका रेस्टॉरंटमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा (Double murder) गुंता सोडवण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुण्यातून एका वेटरला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी कल्लू यादव याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याने गेल्या 30 मे रोजी रेस्टॉरंटची मॅनेजर आणि साफसफाई कर्मचारीची निर्घृण हत्या केली होती. जेवणावरून वाद झाल्यामुळे दोघांची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

हेही वाचा..काय सांगताsss दारू स्वस्त होणार, राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

पाण्याच्या टाकीत सापडले मृतदेह...

मीरा रोड येथील साबरी रेस्तरां अॅण्ड बारच्या पाण्याच्या टाकीत हरीश शेट्टी (42) आणि नरेश पंडित (53) या दोघांचे मृतदेह शुक्रवारी सापडले होते. शेट्टी हा बारचा मॅनेजर होता तर पंडित हा सफाई कर्मचारी होता. आरोपीनं दोघांची हत्या केल्यानंतर पुण्याला पलायन केलं होतं.

पोलिसांच्या एका पथकानं आरोरीला शुक्रवारी पर्वती परिसरातून अटक केली. पोलिस चौकशीत आरोपी कल्लू यादव यांन दुहेरी हत्या केल्याचं कबूल केलं आहे.

आरोपीनं सांगितलं की, मॅनेजर हरीश शेट्टी हा लॉकडाऊनच्या काळात त्याला केवळ डाळ-भात देत होता. मात्र, स्वत: चवीस्ट जेवण करत होता. याच रागातून आरोपीनं शेट्टी आणि पंडित यांची हत्या केली.

हेही वाचा.. 'कोरोनाचा लढा' हा राजकारणाचा विषय नाही, गिरीश महाजन यांचा शिवसेनेला टोला

कुदळ घातली डोक्यात...

30 मे रोजी हरीश शेट्टी हा रेस्टॉरंटमध्ये झोपला होता. हीच संधी साधून आरोपी कल्लू यादव याने त्याच्या डोक्यात कुदळ घातली. नंतर पंडीत यांचीही त्याच पद्धतीनं हत्या केली. दोघांचे मृतदेह रेस्टॉरंटमधील पाण्याच्या टाकीत टाकून तो फरार झाला होता.

आरोपी हा पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे. त्याने 2013 मध्ये कोलकाता येथे एक हत्या केली होती. या प्रकरणी त्याला तुरुंगवासही झाला होता.

First published: June 7, 2020, 7:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading