गोव्याची ट्रिप आईपासून लपवण्यासाठी मुंबईच्या तरुणीने केलं 'कांड'; वर्षभरानंतर झाला खुलासा

गोव्याची ट्रिप आईपासून लपवण्यासाठी मुंबईच्या तरुणीने केलं 'कांड'; वर्षभरानंतर झाला खुलासा

आईला आपल्या गोवा सहलीबद्दल कळू नये म्हणून एका युवतीने चक्क पासपोर्टवर खाडाखोड केली. 11 महिन्यांनी हा धक्कादायक प्रकार समोर आला आणि ती थेट गजाआड गेली.

  • Share this:

मुंबई, 23 फेब्रुवारी : गोव्यात आपल्या मित्रांबरोबर सुट्टीला गेल्याची बाब आईपासून लपवून ठेवण्याच्या प्रयत्नात 28 वर्षीय महिला थेट पोलिस कोठडीत पोहचल्याची घटना समोर आली आहे. दुबईहून (Dubai to Mumbai) मुंबईत (Mumbai) परतल्यावर ही तरुणी मित्रांसह सुट्टीसाठी थेट गोव्याला गेली. हा प्रकार आपल्या आईपासून लपवण्यासाठी तिने दुबई येथून आगमन झाल्याची (Mumbai Arrival) पासपोर्टवरील (Passport tampering) तारीख बदलण्यासाठी बनावट रबरी स्टॅम्पचा (Rubber Stamp) वापर केला. पण तिचं पितळ उघडं पडलं.

तिचं हे कृत्य इमिग्रेशन विभागाच्या लक्षात आलं जवळपास 11 महिन्यांनी. गेल्या शुक्रवारी ती पुन्हा दुबईला जात असताना इमिग्रेशन अधिकाऱ्यांना (Immigration Officers) पासपोर्टवर बनावट स्टँपिंग असल्याचं लक्षात आलं. चुकीची अरायव्हल डेट लक्षात आली आणि तिला सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार अंबर बद्रुजोहा सय्यद असं या तरुणीचं नाव आहे.  इमिग्रेशनने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे तिच्याविरुद्ध कलम 465 (बनावट शिक्क्याप्रकरणी शिक्षा), 468 (फसवणूकीसाठी खोट्या शिक्क्याचा वापर), 471 (बनावट गोष्ट खरी दाखवणे), आणि 420 (फसवणूक) अंतर्गत एफआयआऱ दाखल करण्यात आल्याचे सहार पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जगदीश देशमुख यांनी सांगितले. या महिलेला रविवारी वांद्रे येथील सुट्टीकालीन न्यायलयात हजर केले असता तिला 22 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.पोलिसांनी सांगितले की अजून तिचा सविस्तर जबाब नोंदवायचा असून, त्याशिवाय रबरी स्टॅम्प जप्त करणे शक्य होणार नाही.

 अवश्य वाचा -   गँगस्टर रवी पुजारीचा खरा फोटो आला समोर, मुंबई पोलिसांनी केली अटक

असा घडला प्रकार :

अंबर बद्रुजोहा सय्यद असे या महिलेचे नाव आहे. ती गेल्या तीन वर्षांपासून दुबईत (Dubai) काम करते. मागच्या वर्षी 14 मार्चला दुबईहून ती परतली होती. त्यानंतर लगेचच ती मित्रांबरोबर गोव्याला गेली. त्यानंतर 20 मार्चला ती मुंबईत परतली. याबाबत सहारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबर मुंबईत परतल्यानंतर आपण आताच दुबईहून परतलो आहोत असं आईला भासवण्यासाठी तिने पासपोर्टवर आगमनाची तारीख बदलली. परंतु, याच तारखेदरम्यान कोरोनामुळे (Corona Pandemic) सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणं थांबवण्याचा निर्णय घेतला होता. विमानतळावरून घरी परतत असताना तिने एका स्टोअरमधून 20 मार्च ही आगमनाची तारीख बदलण्यासाठी रबर स्टॅम्प खरेदी केला होता.

आता 19 फेब्रुवारीला ती दुबईला परत जात असताना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (International Airport) काऊंटर क्रमांक 30 वरील इमिग्रेशन अधिकाऱ्याला ती 14 मार्च रोजी मुंबईत आल्याचं सिस्टीममध्ये दिसून आलं. पण पासपोर्टवर मात्र 20 मार्च अशी तारीख आढळून आली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचे पोलिसांनी सांगितले. जेव्हा इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिच्या प्रश्नांचा भडीमार करताच ती गोंधळून गेली आणि गोव्याला सहलीसाठी गेल्याची बाब आईपासून लपवून ठेवण्यासाठी रबरी स्टॅम्पचा वापर करुन पासपोर्टवरील तारीख बदलल्याचं तिने कबूल केलं.

Published by: Aditya Thube
First published: February 23, 2021, 6:56 PM IST

ताज्या बातम्या