मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, खंडणी प्रकरणात 2 पोलिसांना अटक

BREAKING : परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, खंडणी प्रकरणात 2 पोलिसांना अटक


नरीमन पाँईट पोलीस स्टेशनमध्ये खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

नरीमन पाँईट पोलीस स्टेशनमध्ये खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

नरीमन पाँईट पोलीस स्टेशनमध्ये खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई, 08 नोव्हेंबर : मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) कोठडीत आहे. तर दुसरीकडे, त्यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (parmabir singh) यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे.  खंडणी प्रकरणात दोन पोलीस निरीक्षकांना अटक करण्यात आली आहे.

परमबीर सिंग खंडणी प्रकरणात राज्य सरकारने SIT स्थापन केली होती. या समितीने केलेल्या चौकशी दरम्यान पुरावे आढळून आले होते. त्यानंतर स्टेट सीआयडीने  दोन पोलीस निरीक्षकांना अटक केली आहे. नंदकुमार गोपाले आणि आशा कोरके अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नाव आहे.

महाराष्ट्राला मिळाला जागतिक पुरस्कार; पर्यावरण क्षेत्रातल्या कामगिरीसाठी कौतुक

जिया खान आत्महत्या प्रकरणासह अनेक महत्वाची प्रकरणे विशेष करुन मुंबईत घडलेली सामूहिक बलात्कार प्रकरणात तपास आशा कोरके यांनी केला होता.  तर नंदकुमार गोपाले याने आयपीएल मॅच फिक्सिंगचा तपास पाहिला होता.

नरीमन पाँईट पोलीस स्टेशनमध्ये खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

देशमुखांविरोधात शिल्लक पुरावे नाहीत -परमबीर सिंगांचा खुलासा

काही दिवसांपूर्वीच  100 कोटी वसुली प्रकरणी परमबीर सिंग यांनी चौकशी समितीकडे प्रतिज्ञापत्र सादर केले. 'अनिल देशमुखांविरोधात आता आपल्याजवळ देण्यासारखे काहीही पुरावे शिल्लक नाहीत' असा खुलासा परमबीर सिंग यांनी केला.

100 कोटी वसुली प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल (Retired Justice Kailash Uttamchand Chandiwal) यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून परमबीर सिंग यांची चौकशी सुरू आहे. पण, आतापर्यंत एकदाही परमबीर सिंग हे चौकशीला हजर झाले नाही. अखेर आता परमबीर सिंग यांनी चांदिवाल आयोगापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

विराटनेच केली टी-20 टीमच्या नव्या कॅप्टनची घोषणा! आता BCCI काय करणार?

अनिल देशमुख यांच्यावर मी जे काही आरोप केले होते, आता त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे आपल्याकडे शिल्लक नाही, असा खुलासा सिंग यांनी केला आहे. सिंग यांनी 13 तारखेलाच हे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. अनिल देशमुख यांना अटक आणि कोठडी मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

First published: