मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Under2 Coalition: महाराष्ट्राला मिळाला जागतिक पुरस्कार; पर्यावरण क्षेत्रातल्या कामगिरीसाठी कौतुक होणारं देशातलं एकमेव राज्य

Under2 Coalition: महाराष्ट्राला मिळाला जागतिक पुरस्कार; पर्यावरण क्षेत्रातल्या कामगिरीसाठी कौतुक होणारं देशातलं एकमेव राज्य

स्कॉटलंडमधील अंडर२ कोएलिशनच्या (Under2 Coalition, Scotland)  तीन पुरस्कारांपैकी एक पुरस्कार मिळवणारं देशातील एकमेव राज्य महाराष्ट्र ठरलं आहे. हा पुरस्कार स्वीकारणारे आदित्य ठाकरे जगातले सर्वांत तरुण पर्यावरण मंत्री ठरले.

स्कॉटलंडमधील अंडर२ कोएलिशनच्या (Under2 Coalition, Scotland) तीन पुरस्कारांपैकी एक पुरस्कार मिळवणारं देशातील एकमेव राज्य महाराष्ट्र ठरलं आहे. हा पुरस्कार स्वीकारणारे आदित्य ठाकरे जगातले सर्वांत तरुण पर्यावरण मंत्री ठरले.

स्कॉटलंडमधील अंडर२ कोएलिशनच्या (Under2 Coalition, Scotland) तीन पुरस्कारांपैकी एक पुरस्कार मिळवणारं देशातील एकमेव राज्य महाराष्ट्र ठरलं आहे. हा पुरस्कार स्वीकारणारे आदित्य ठाकरे जगातले सर्वांत तरुण पर्यावरण मंत्री ठरले.

मुंबई, 8 नोव्हेंबर: वातावरण कृतीसाठी अंडर२ कोएलिशनकडून महाराष्ट्राला प्रादेशिक नेतृत्वाचा जागतिक पुरस्कार मिळाला आहे. स्कॉटलंडमधील अंडर२ कोएलिशनच्या (Under2 Coalition, Scotland)  तीन पुरस्कारांपैकी एक पुरस्कार मिळवणारं देशातील एकमेव राज्य महाराष्ट्र ठरलं आहे. वातावरण संरक्षणासाठी राज्यस्तरावर केलेल्या प्रयत्नांची घेतली दखल घेतली गेली. पआदित्य ठाकरे यांनी स्कॉटलंडमध्ये हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार स्वीकारणारे ते जगातले सर्वांत तरुण पर्यावरण मंत्री ठरले.

वातावरण कृतीसाठी कटिबद्ध अशा अनेक राज्ये आणि प्रदेशांचे सर्वात मोठे जाळे  असलेल्या ‘अंडर२ कोएलिशन’च्या नेतृत्व पुरस्कार सोहळ्यातील पहिला ‘प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्वा’चा पुरस्कार  महाराष्ट्राने पटकविला.  COP 26 समिटसोबतच ग्लासगोमध्ये हा सोहळा झाला.

वातावरण बदलामुळे (Climate Change) भारतात होणारे परिणाम कमी करणे आणि त्यासाठी अनुकुलता निर्माण करणे यासाठी महाराष्ट्राने देशामध्ये सर्वप्रथम राज्यव्यापी असा कार्यक्रम राबवून वातावरण नेतृत्वाविषयीची कटिबद्धता दाखवली आहे. ‘अंडर२ कोएलिशन’मध्ये तीनपैकी एक पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये ब्रिटिश कोलंबियाला (कॅनडा) ‘क्रिएटिव्ह क्लायमेट सोल्युशन्स’, क्युबेकला (कॅनडा) ‘क्लायमेट पार्टनरशिप्स’चा पुरस्कार मिळाला आहे.

पंतप्रधान मोदींनी जिथे केले भाषण, तिथे आदित्य ठाकरेंनी स्विकारला पुरस्कार

“कोणत्याही भौगोलिक, वांशिक, राष्ट्रीय किंवा लिंगभेद अशा सीमा न पाहता या जागतिक संकटासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्न आणि अर्थपूर्ण कृती करणे ही तातडीची गरज आहे अशी आमची धारणा आहे. आम्ही मनापासून करत असलेल्या वातावरण कृतींची ‘अंडर२ कोएलिशन’ने दखल घेतली त्यासाठी आम्हाला आनंद झाला आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

टीम महाराष्ट्रने ‘अंडर२ कोएलिशन’मध्ये ‘प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व’, ‘क्रिएटिव्ह सोल्यूशन्स’ आणि ‘क्लायमेट पार्टनरशिप्स’ अशा सर्व विभागात प्रवेशिका पाठविल्या होत्या. अंडर२ हा विविध राज्ये आणि प्रदेशांच्या नेतृत्वांचा समूह वातावरण कृतीसाठी प्रतिबद्ध असून, अंडर२ कोएलिशनमध्ये जगभरातील २६० सदस्य आहेत. अंडर२ कोएलिशनच्या २६० राज्य सरकारांमध्ये भारतातील चार राज्ये सामील आहेत.  क्रिएटिव्ह क्लायमेट सोल्युशन्स आणि क्लायमेट पार्टनरशिप्स पुरस्कार मिळवले नसले तरी त्यामध्ये ‘विशेष दखल’ घेतलेले महाराष्ट्र हे या चार राज्यातील एकमेव राज्य आहे.

" isDesktop="true" id="628463" >

भारतातील सर्वाधिक औद्योगिककरण झालेल्या आणि 720 किमीची संवेदनशील किनारपट्टी असलेल्या महाराष्ट्राने आपल्या नामांकनामध्ये थोडक्या वेळात राज्याने केलेल्या प्रयत्नांची विस्तृत माहिती दिली. धोरण ठरविण्याच्या प्रक्रियेत वातावरण सक्षमतेचा समावेश करण्याची गरज राज्याने ओळखली आणि नवे प्रकल्प सुरु केले, तसेच शाश्वत विकासाला प्राधान्यता देत कायमस्वरुपी बदल होईल अशा धोरणे आणि उपक्रमातून ते दिसले, या बाबी अधोरेखित केल्या.

राज्य सरकार महाराष्ट्रात वातावरण कृती संस्कृती तयार करण्यात यशस्वी झाल्याची बाब ठळकपणे मांडण्यात आली. याच राज्याने गेल्या वर्षी वातावरणसंबंधी आपत्तींमुळे दोन अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका खर्च केला आहे.

बर्फ नाही हा विषारी फेस! याच पाण्यात छठ पूजेसाठी भाविक मारतायत डुबकी पाहा VIDEO

‘माझी वसुंधरा’ किंवा ‘द माय अर्थ’ या राज्यव्यापी उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक आणि प्रादेशिक भागीदारी यशस्वीपणे साकारली गेली. वातावरण बदलामुळे होणारे परिणाम कमी करणे आणि त्यासाठी अनुकूल धोरण स्वीकारणे यावर लक्ष केंद्रीत करणारा हा जगातील एकमेव राज्यव्यापी सर्वांगीण उपक्रम आहे. माझी वसुंधरा अभियान दुसऱ्या वर्षात राज्यातील संपूर्ण लोकसंख्या व्यापण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याची योजना आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्रात पुढील काळात वातावरण कामांसाठी जागतिक भागीदारीच्या अनुषंगाने राज्य “यूएन रेस टू झिरो’ उपक्रमासोबत वेगाने वाटचाल करत असून, जागतिक स्तरावर वातावरण बदलावर उपाय करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ‘सी४० सिटीज’मध्ये सहभागी झाले आहे. जलिस्को, मेक्सिको,पॅसिफिक कोस्ट कोलॅबरेटिव्ह,व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया या प्रांतांचीही विशेष दखल घेण्यात आली.  क्रिएटिव्ह क्लायमेट सोल्युशन्स गटात ब्रिटिश कोलंबिया या कॅनडाच्या प्रांताला पुरस्कार मिळाला. भारतातल्या महाराष्ट्राबरोबर पर्नामबुको, ब्राझील यांचीही दखल घेण्यात आली.

First published:

Tags: Aaditya thackeray, Climate change, Environment