मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : विराटनेच केली टी-20 टीमच्या नव्या कॅप्टनची घोषणा! आता BCCI काय करणार?

T20 World Cup : विराटनेच केली टी-20 टीमच्या नव्या कॅप्टनची घोषणा! आता BCCI काय करणार?

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) नामिबियाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) टॉससाठी मैदानात उतरला. टी-20 फॉरमॅटमधला विराटचा कॅप्टन म्हणून हा अखेरचा टॉस होता.

  • Published by:  Shreyas

दुबई, 8 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) नामिबियाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) टॉससाठी मैदानात उतरला. टी-20 फॉरमॅटमधला विराटचा कॅप्टन म्हणून हा अखेरचा टॉस होता. वर्ल्ड कप सुरू व्हायच्या आधीच विराटने ही टी-20चा कर्णधार म्हणून आपली अखेरची स्पर्धा असेल, असं विराट म्हणाला होता. टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलला क्वालिफाय झाली नसल्यामुळे नामिबियाविरुद्धचा सामना विराटसाठी अखेरचा आहे. विराटनंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण होणार, याबाबत अजून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. पण नामिबियाविरुद्धच्या सामन्यात टॉसवेळी विराटने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे याचे संकेत मिळाले आहेत.

'टीम इंडियाचं नेतृत्व करणं सन्मानाची गोष्ट आहे. मी आपली सर्वोत्तम कामगिरी केली. आता मोठ्या फॉरमॅटसाठी मला छोटा फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडावी लागत आहे. मला संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. टीमला पुढे नेण्यासाठी आता पुढच्या खेळाडूंची वेळ आली आहे. रोहित शर्मा लिमिटेड ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करत आहे. भारतीय क्रिकेट चांगल्या हातात आहे,' असं विराट म्हणाला. विराटच्या या वक्तव्यामुळे त्यानेच रोहित शर्माची (Rohit Sharma) पुढचा कॅप्टन म्हणून घोषणा केली नाही ना? असा प्रश्न विचारला जात आहे.

रोहित आयपीएलचा सगळ्यात यशस्वी कॅप्टन

रोहित शर्मा आयपीएलचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने सर्वाधिक 5 वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकली. तर दुसरीकडे विराटला एकही आयपीएल किंवा आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. 17 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टी-20 सीरिजला सुरुवात होणार आहे, त्यामुळे बीसीसीआय लवकरच नव्या कर्णधाराची घोषणा करेल.

अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी रोहित शर्माला टी-20 शिवाय वनडे टीमचा कर्णधार करण्याची मागणी केली आहे. लिमिटेड ओव्हर क्रिकेट आणि टेस्ट क्रिकेटसाठी दोन वेगळे कॅप्टन बनवण्यात यावेत, इंग्लंडनेही हाच फॉर्म्युला वापरला आहे, असं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे. इयन मॉर्गन इंग्लंडच्या वनडे आणि टी-20 टीमचा तर जो रूट टेस्ट टीमचा कर्णधार आहे.

First published:

Tags: Rohit sharma, T20 world cup, Team india, Virat kohli