मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /आता परमबीर सिंग यांची बारी, हजर व्हावे लागणार ईडीच्या दारी!

आता परमबीर सिंग यांची बारी, हजर व्हावे लागणार ईडीच्या दारी!

100 कोटी वसुलीचा लेटर बॉम्ब टाकून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग param bir singh) यांनी एकच खळबळ उडवून दिली पण...

100 कोटी वसुलीचा लेटर बॉम्ब टाकून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग param bir singh) यांनी एकच खळबळ उडवून दिली पण...

100 कोटी वसुलीचा लेटर बॉम्ब टाकून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग param bir singh) यांनी एकच खळबळ उडवून दिली पण...

मुंबई, 10 जुलै : 100 कोटी वसुलीचा लेटर बॉम्ब टाकून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग param bir singh) यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या पत्रामुळे राष्ट्रवादीचे (ncp) नेते अनिल देशमुख (anil deshmukh) यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण, आता परबीर सिंग सुद्धा ईडीच्या (ed) रडारवर आले असून लवकरच त्यांची चौकशी होणार, असल्याची माहिती समोर आली आहे.

100 कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांना एकापाठोपाठ समन्स बजावण्यात आले आहे. अनिल देशमुख  यांनी अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर दुसरीकडे ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले आहे ते परमबीर सिंग सुद्धा अडचणीत सापडले आहे. महाराष्ट्र टाइम्स दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी लवकर परमबीर सिंग यांना चौकशीला बोलावून त्यांचा जबाब नोंदवणार आहे. त्यांना त्याबद्दल समन्स सुद्धा बजावला आहे.

सातारच्या भामट्यानं पुण्यातील तरुणीला फसवलं; 'रॉ'ची भीती घालत 10 लाखांचा गंडा

परंतु, परमबीर सिंग यांनी ईडी समोर हजर राहण्यासाठी काही कारणास्तव अवधी मागून घेतला होता. पण, आता दुसरीकडे देशमुख यांना समन्स बजावला असून परमबीर सिंग यांना सुद्धा ईडीच्या समोर हजर राहावे लागणार आहे.

आनंदाची बातमी! पुणेकर लवकरच करणार गारेगार मेट्रोनं प्रवास, कधी ते वाचा सविस्तर

दरम्यान, ईडी आता सचिन वाझे याची चौकशी करणार आहे. याबद्दल मुंबई PMLA न्यायालयाने ईडीला परवानगी दिली आहे. तळोजा जेलमध्ये जाऊन ईडी चौकशी करणार आहे.  अनिल देशमुखांच्या खासगी सचिवांना ७० लाख रुपये दिले होते, असा खुलासा सचिन वाझेने जबाबात केला होता. एवढंच नाहीतर, याबद्दल अनिल देशमुख थेट आदेश द्यायचे, असंही वाझेनं आपल्या जबाबत म्हटलं होतं.  वाझेच्या जबाबाने आणखी 2 महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या अडचणीत वाढ होवू शकते, त्यामुळे ईडीच्या चौकशीतून काय माहिती समोर येणार हे हे पाहण्याचं ठरणार आहे.

First published:

Tags: Anil deshmukh