पुणे, 10 जुलै: साताऱ्यातील (Satara) एका तरुणानं आपण अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेत अधिकारी (FBI Agent) असल्याची बतावणी करत पुण्यातील एका उच्चशिक्षित तरुणीला 10 लाखांचा गंडा (Fraud 10 lac) घातला आहे. तुझ्यावर भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ (RAW) ची नजर असल्याची भीती दाखवत आरोपीनं तिच्याकडून तब्बल 8 लाख 37 हजार रूपये ट्रान्सफर केले आहेत. याशिवाय आरोपीनं पीडित तरुणीचा अॅपल कंपनीचा 1 लाख 28 हजार रुपये किमतीचा लॅपटॉपही (Apple laptop) लांबवला आहे. आरोपीनं तरूणीला जवळपास दहा लाख रूपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अमित चव्हाण असं अटक केलेल्या 30 वर्षीय तरुणाचं नाव असून तो साताऱ्यातील रहिवासी आहे. तर धायरी येथील रहिवासी असणाऱ्या 28 वर्षीय तरूणीनं चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पीडित तरुणीनं फॅशन डिझायनिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तर संशयित आरोपी अमित हा चाकण परिसरात तिच्यासोबत राहण्यास होता. एप्रिल 2021 मध्ये आरोपी अमित आणि पीडित तरूणीची 'बेटर हाफ' या सोशल मीडिया अॅपमधून ओळख झाली होती. दरम्यान आरोपीनं आपणम अमेरिकेतील गुप्तचर विभागातील अधिकारी असल्याचं सांगत सध्या भारतात तपासासाठी आल्याची बतावणी केली.
हेही वाचा-धक्कादायक! अनैतिक संबधातून रचला कट; 6जणांनी घरात घुसून विवाहित महिलेला पाजलं विष
आरोपीनं सुरुवातीपासून त्याची ओळख राहुल राजाराम पाटील अशी सांगितली होती. तरुणीचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपी तिला बाणेर परिसरात भेटायला आला. याठिकाणी आल्यानंतर आरोपीनं तुझ्यावर आणि माझ्यावर रॉ (रिसर्च अॅनालिसीस विंग) नजर असल्याची भिती घातली. तसेच तिला तिचा लॅपटॉप फॉरमॅट करण्यास सांगितला. विविध कारणे सांगून त्यानं तिचं सिमकार्ड, एटीएमकार्डही स्वतःच्या ताब्यात घेतलं.
हेही वाचा-मुंबईतील ATM वरील दरोड्याचा प्रयत्न हैदराबादेतून रोखला; अशा आवळल्या मुसक्या
पीडितेला वारंवार रॉची भीती दाखवत आरोपीनं तिच्या खात्यातून तब्बल 8 लाख 37 हजार रूपये ट्रान्सफर करून घेतला. तसेच आरोपीनं पीडित तरुणीचा अॅपल कंपनीचा 1 लाख 28 हजार रुपये किमतीचा लॅपटॉपही लांबवला. अशाप्रकारे आरोपीनं तरुणीला जवळपास 10 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. 'रॉ'ची माझ्यावर नजर असल्यानं एक महिना माझा मोबाइल फोन असेल अशी थाप आरोपीनं मारली. एक महिना उलटून गेल्यानंतरही आरोपीचा फोन बंद लागला. यामुळे संशय बळावल्यानं पीडितेनं चतुःश्रृगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तोतया गुप्तचर अधिकाऱ्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Financial fraud, Pune, Satara