जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Panvel Crime News : विष प्राशन करत तरूण आणि तरूणीने उचलले टोकाचे पाऊल, प्रेमप्रकरणाचा संशय

Panvel Crime News : विष प्राशन करत तरूण आणि तरूणीने उचलले टोकाचे पाऊल, प्रेमप्रकरणाचा संशय

Panvel Crime News : विष प्राशन करत तरूण आणि तरूणीने उचलले टोकाचे पाऊल, प्रेमप्रकरणाचा संशय

पनवेलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेल तालुक्यातील टावरवाडी येथे दोघांनी एकाचवेळी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • -MIN READ Panvel,Raigad,Maharashtra
  • Last Updated :

प्रमोद पाटील (पनवेल), 22 जानेवारी : पनवेलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेल तालुक्यातील टावरवाडी येथे दोघांनी एकाचवेळी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आत्महत्या केलेल्यापैकी एक 20 वर्षीय तरूण आहे तर 16 वर्षीय तरूणी असल्याची माहिती मिळत आहे. तननाशक औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान घटनास्थळी पोलीस तपास करत आहेत. या दोघांनी कोणत्या कारणावरून आत्महत्या केली याबाबत अद्यापही कोणतीही माहिती समोर आली नाही. या घटनेने पनवेल परिसरात खळबळ माजली आहे.

जाहिरात

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेल तालुक्यातील टावरवाडी येथे दोघांनी एकाचवेळी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आत्महत्या केलेल्यापैकी एक 20 वर्षीय तरूण आहे तर 16 वर्षीय तरूणी असल्याची माहिती मिळत आहे.  

हे ही वाचा :  भाऊ, भावजयी जीवावर उठले, नायब तहसिलदाराला भर रस्त्यात आडवून अंगावर पेट्रोल टाकलं अन्..; बीडमधील धक्कादायक घटना

तननाशक औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान घटनास्थळी पोलीस तपास करत आहेत. या दोघांनी कोणत्या कारणावरून आत्महत्या केली याबाबत अद्यापही कोणतीही माहिती समोर आली नाही. या घटनेने पनवेल परिसरात खळबळ माजली आहे.

पनवेल परिसरात असणाऱ्या जंगलात जाऊन त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या दोघांच्या प्रेमाला घरातून विरोध झाल्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोघेही एकाच गावातील असल्याने गावावर शोककळा पसरली आहे. पनवेल पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  धक्कादायक! व्हॉट्सअ‍ॅपला ‘आय एम लूजर…’स्टेटस ठेवून बँक कर्मचाऱ्याने संपवलं जीवन

या दोघांनी अचानक असे पाऊल उचलल्याने भागात जोरदार चर्चा सुरू होती. पोलीसांनी प्रेमप्रकरणाचा संशय येत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याबाबत अद्याप कोणाला ताब्यात घेण्यात आले नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात